";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोणावळा नगरपरिषदेस वरील दोन नामांकने

लोणावळा नगरपरिषदेस वरील दोन नामांकने

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 28 (प्रशांत पुराणिक, प्रतिनिधी) : भारतभर सध्या सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्पर्धेध्ये लोणावळा नगरपरिषदेला दोन विभागात नामांकने प्राप्त झाली आहेत. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभाग व शहरी विभाग मंत्रालयाने या स्पर्धा घेतल्या होत्या. दि. 6 मार्च रोजी दिल्ली येथे यासंदर्भातील पारितोषिक वितरण होणार आहे. देशभरातील 4237 शहरांनी यात सहभाग घेतला होता.

त्यांचे सर्वेक्षण होऊन 64 लाख लोकांच्या प्रतिक्रिया व 4 कोटी समाजमाध्यमांवरील प्रतिक्रिया यांचा विचार होऊन केंद्रीय परीक्षण समितीने ही नामांकने जाहीर केली. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी व शहर नागरी स्वच्छ सर्वेक्षण विभाग केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण होणार आहे. प्राप्त झाल्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे. 2018 मध्ये लोणावळा नगरपरिषद 7व्या क्रमांकावर होती. 2019 मध्ये नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती.

नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी जोपर्यंत लोणावळा शहर कचरकुंडीमुक्त होत नाही तोपर्यंत कोठेही सत्कर स्वीकारणार नाही संघटन मजबूत केल्यास गतवैभव - माऊली दाभाडे तळेगाव दाभाडे, दि. 27 : काँग्रेस संघटन मजबूत करून समाजाच्या विकासासाठी झोकून देऊन काम केले तर पक्षाला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्‍वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी व्यक्त केला. तळेगाव युवक काँग्रेसच्या वतीने जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ दाभाडे आळी येथील राम मंदिराच्या प्रांगणात झाला. या वेळी मार्गदर्शन करताना दाभाडे बोलत होते. मावळ तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे,

नगरसेवक निखिल कवीश्‍वर, अ‍ॅड. खंडुजी तिकोने, विलास मालपोटे आदींनी अभिया प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. सर्वांनी भाजपचे सरकार खोटी आश्‍वासने देत असून त्यांचा बुरखा पडून आगामी निवडणुकीत ते जनतेच्या न्यायालयात पराभूत होतील असे भाष्य केले. युवक अध्यक्ष विशाल वाळुंज यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन त्यांना गौरविण्यात आले. अ‍ॅड. राजेंद्र पोळ, गणेश काळे, जितेंद्र दाभाडे, सागर गायकवाड, जितेंद्र खळदे आदी उपस्थित होते. विशाल दाभाडे यांनी आभार मानले. सर्वपक्षीय नगरसेवक नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा सन्मान करताना असा पण केला होता. लोणावळा नगरपरिषद सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येऊन सन्मान करण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा पालिकेस दोन नामांकने ही नामांकने प्राप्त करण्यासाठी झालेल्या प्रयत्नात नागरिकांचाही महत्त्वाचा सहभाग असल्याचे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी सांगितले. हा लोणावळ्याचा सन्मान असल्याचे ते म्हणाले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 32

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds