";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोणावळा नगरपरिषदेचे स्वागत भव्य रॅली काढून

लोणावळा नगरपरिषदेचे स्वागत भव्य रॅली काढून

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 13 : स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत देशपातळीवर पश्चिम विभागात द्वितीय क्रमांक पटकावत, लोणावळ्याचे नाव देशभर गाजवणार्‍या

लोणावळा नगरपरि देचे स्वागत भव्य रॅली काढून करण्यात आले. यात हजारो लोणावळेकर सहभागी झाले होते. दि. 6 मार्च रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण 2019 मधील विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण 2019 मधील यशाबद्दल लोणावळ्यात विजय जल्लोष रॅली यात लोणावळा नगरपरिषदेने दोन विभागात नामांकने प्राप्त केली. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व गोवा या पाच राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागात एक हजाराहून अधिक शहरांनी सहभाग नोंदवला होता. यात दुसरे स्थान लोणावळा शहराला मिळाले. याशिवाय कचराकुंडीमुक्त शहरासाठीची तीन तारांकनेही प्राप्त झाली आहेत.दोन वर्षे सातत्याने अथक परिश्रम करत मिळालेल्या या यशाचे स्वागत व आनंद साजरा करण्याकरिता या जल्लोष रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात येऊन, स्वच्छतेच्या गुढ्या उभारण्यात आल्या. पारंपरिक वेषभूषा करून स्वच्छतेची पालखी काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह हजारो नागरिक यात सहभागी होते. ढोल पथक व बँड पथकही सहभागी झाले होते. श्रीराम मंदिर गवळीवाडा येथून रॅलीला सुरुवात झाली व नगरपरिषद कार्यालयासमोर समारोप करण्यात आला. या वेळी 10 घंटा गाड्यांचे लोकार्पण आमदार संजय (बाळा) भेगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,

मुख्याधिकारी सचिन पवार, सर्व नगरसेवक व विषय समितीचे सभापती उपस्थित होते. मागील वर्षी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी शहर कचराकुंडीमुक्त झाल्याशिवाय कोणताही सत्कार स्वीकारणार नाही, असा पण केला होता. त्यानुसार वर्षभर कोणताही सत्कार न स्वीकारता त्यांनी व सर्व सहकार्‍यांनी अहोरात्र मेहनत करून शहरातील सुारे 155 कचरा कुंड्या नष्ट करून शहर कचराकुंडीमुक्त केले.

वरसोली कचरा डेपो येथील जागा विकत घेऊन, नगरपरिषदेने तेथे सुरक्षा भिंत उभारणी करत, बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. सुक्या कचर्‍यापासून खतनिर्मिती केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये लोणावळा शहराला प्रथम क्रमांक मिळण्याकरिता प्रयत्न होणार असल्याचा मानस या वेळी व्यक्त करण्यात आला.

या अभियानात लोणावळ्यात महत्त्वाचे योगदान देण्याचा लोणावळा शहर पत्रकार संघ, चित्रकार ग्रुप, संत निरंकारी बाबा ट्रस्ट व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला. लोणावळा शहराला देशामध्ये स्वच्छ व सुंदर शहर म्हणून कायमस्वरूपी ओळख देणार असून केवळ स्पर्धा म्हणून याकडे पाहणार नसल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी साप्ताहिक अंबरला सांगितले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 22

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds