लोणावळा महिला पत्रकार संतोषी तोंड यांना मारहाण

Tuesday, 26 March 2019 10:39 pragati
Print

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 22 : येथील साप्ताहिक बुलंद मावळच्या पत्रकार सौ. संतोषी तोंडे यांना खोपोली पोलीस स्थानकात त्यांच्या नातेवाइकांकडून मारहाण करण्यात आली. पोलीस स्थानकातच झालेल्या या मारहाणीमुळे पोलिसांवर कसा विेशास ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भातील घटना अशी की, गुरुवार दि. 13 मार्च रोजी सौ. तोंडे या आपल्या खोपोली येथील गाळ्यामधील सामान दिरांनी त्यांच्या अनुपस्थितीत फेकून दिल्याची तक्रार देण्याकरिता खोपोली पोलीस स्थानक येथे गेल्या असता, विशाल अरुण तोंडे, सुरेखा अरुण तोंड ,देवेंद्र अरुण तोंडे, वैभव अरुण तोंडे   अभिजित अनंता तोंडे यांच्यासह इतर वीस अज्ञात इसमांनी सौ. तोंडे यांना लाथा बुक्क्यांनी खाली पाडून जबर मारहाण केली. त्या पवना हॉस्पिटल तळेगाव येथे उपचार घेत आहेत. यासंदर्भात सी.सी.टीव्ही फुटेजची मागणी त्यांचे बंधू सुरज केदारी यांनी मा. पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे केली आहे. लोणावळ  शहर पत्रकार संघाने या घटनेचा निषेध केला असून, यासंदर्भात चौकशी व्हाव  असे पत्र खोपोली पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. एक पत्रकार, तीही महिला असताना, तिच्यावर हा अत्याचार झालेला आहे  पोलीस स्थानकात पोलीस असताना ही घटना घडतेच कशी असा प्रश्न ना गरिक विचारत आहेत.

Share