";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ‘गणरायन अ‍ॅवॉर्ड 2019’ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला

‘गणरायन अ‍ॅवॉर्ड 2019’ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 5 : लोणावळा शहर पोलीस ठाणे आयोजित गणरायन अ‍ॅवॉर्ड 2019’ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तुंगार्ली येथील ओकार तरुण मंडळ प्रथम क्रमांक, सिद्धार्थनगर येथील महाराष्ट्र मातंग समाज मंडळ द्वितीय तर खंडाळा येथील संत रोहीदास मित्रमंडळाने तृतीय क्रमांक मिळवला. नेहरू मित्र मंडळ, शिवाजी मित् मंडळ व अष्टविनायक म त्र मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. नेहरू मित्र मंडळ व राणा प्रताप मित्र मंडळ यांना उत्कृष्ट देखाव्यांबद्दल सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील 50 लोणावळा शहर पोलीस ठाणे आयोजित गणरायन अ‍ॅवॉर्ड 2019 सोहळा उत्साहात संपन्न गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवला होता.

उपक्रमशीलता, महिला सहभाग, देखावे, देखाव्यातील सामाजिक संदेश, गणेशोत्सवात आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था, शिस्त, सजावट, ध्वनिक्षमता आदी मापकांच्या आधारे एकूण 10 परीक्षकांच्या समितीने यांचे परीक्षण केले होते. या कार्यक्रमात हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्यात आला. कोल्हापूर येथील प्रसिद्ध गायक प्रकाश हिरेठ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अंतरंगया मराठी, हिंदी गीते व नृत्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत,

लोणावळा शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, राष्ट्रीय महिला कबड्डीपटू लक्ष्मी भगवंतराव पाटील, रि.प. (अ) जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेना नेत्या शादान चौधरी, मंजुश्री वाघ, सुनिल इंगुळकर यांचेसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अमोल कसबेकर यांनी केले. याच कार्यक्रमात मुस्लीम समाजाकडून, कार्यक्रमाकरिता आलेले मान्यवर व उपस्थितांना चहा, बिस्किटे वाटप करण्यात येऊन एकतेचा संदेश दिला गेला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 30

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds