";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कॉरिडॉर प्रकल्प कागदावरच

कॉरिडॉर प्रकल्प कागदावरच

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

लोणावळा, दि. 5 : लोणावळा ते पुणे दरम्यान प्रस्तावित तिसर्‍या आणि चौथ्या

लोह मार्गाच्या उपनगरीय कॉरिडॉरचा प्रस्ताव रेल्वेने मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र यासाठी कोणताही ठोस निर्णय न घेता निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने थेट पिंपरी-चिंचवड महापालिका, प्राधिकरण, पीएम आरडीएल, रस्ते विकास महामंडळ यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान रेल्वेने या संदर्भात मे महिन्यात सरकारला स्मरणपत्र पाठविले होते. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने हा कॉरिडॉर प्रकल्प कागदावरच आहे. कॉरिडॉरसंदर्भातील अंतिम अहवाल रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारीत केंद्रीय रेल्वे

बोर्डाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे त्यासाठी सरकारकडून निधी मिळाल्यानंतर रेल्वेकडून मान्यता मिळणार आहे. राज्य पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसर्‍या व चौथ्या लोहमार्गाचा प्रश्न सरकारने त्याला मान्यता देण्याऐवजी संबंधित आस्थापनांना पत्र पाठविल्याने ह प्रस्ताव अडकून पडला आहे. उपनगरीय रेल्वेची तिसरी व चौथी लाइन टाकण्यासाठी निधीची आवश्यकता असून, त्यात भूसंपादन, लाइन टाकणे व अन्य कामे करायची आहेत. त्यासाठी निधी मिळत नाही असे चित्र आहे. हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल याची सुतराम शक्यता आज तरी दिसत नाही.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 27

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds