";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अनधिकृत बांधकामांवर आता फौजदारी कारवाई

अनधिकृत बांधकामांवर आता फौजदारी कारवाई

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

अनधिकृत बांधकामांवर आता फौजदारी कारवाई

लोणावळा, दि. 5 : येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर नंतर पुन्हा उभ्या राहणार्‍या किंवा नव्याने निर्माण होणार्‍या अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिला. शहरातील बांधकामांचे जीआयएस मॅपिंग, अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे निर्देश पवार यांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिले.

नगरपरिषदेच्या वतीने पुणे-मुंबई महामार्गालगत अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येत आहे. कारवाईत काही ठराविकच बांधकामांवर कारवाई होत असल्याचा आरोप शिवसेनेचे स्वीकृत सदस्य नितीन आगरवाल यांनी केला. अतिक्रमण हटविण्याला विरोध नाही. मात्र ती राहतातच कशी असा प्रश्न आगरवाल यांनी उपस्थित केला आहे. न्यायालयाच्या किंवा कायद्याच्या आधारे काही बड्यांना सवलत दिली जात असून गरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अनेक जण बेरोजगार होणार आहेत,

अशी भूमिका निखिल कवीेशर आणि उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी सभागृहात मांडली. तर नागरिकांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या. कारवाईसाठी तीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून कठोर कारवाई करण्यात येईल, असे सचिन पवार यांनी सांगितले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 27

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds