";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोणावळा शहर पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने केली आरोपीना अटक

लोणावळा शहर पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने केली आरोपीना अटक

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 8 : येथील द्वारकामाई सोसायटीमध्ये भरदिवसा रेशम पुरुषोत्तम बन्सल (77) या वयोवृद्ध महिलेचा खून व जबरी चोरी प्रकरणी, लोणावळा शहर पोलीस व गुन्हे अन्वेषण पथकाने तीन दिवसात आरोपींना राजस्थान येथून जेरबंद केले. अशोककुमार दलराम सरगरा (वय 24) व जगदीशकुमार नेाराम सरगरा (वय 19 दोघेही राहणार मेडाउपरला, जालोर) यांना अटक केली असून पिंटू तारारामजी सरगरा परमार (वय 19) याला संशयावरून ताब्यात घेतले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

या वेळी पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व नवे पोलीस निरीक्षक मनोज यादव उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना काँवत म्हणाले, ‘आरोपी अशोककुमार हा पुरुषोत्तम बन्सल यांच्या दुकानात पूर्वी नोकर म्हणून कामाला होता. त्यानंतर त्याने ते काम सोडून मिलन स्वीटसया बन्सल खूनप्रकरण दुकानात कामाला सुरुवात केली. बन्सल यांच्याकडे कामाला असताना तो त्यांच्या घरी डबा आणण्याकरिता जात असे. त्यावेळी त्याने घरातील कपाट कोठे आहे, दरवाजे कसे आहेत, सी.सी.टिव्ही कॅमेरे आहेत का, पैसे व दागिने घरात कुठे ठेवलेले असतात याची अचूक माहिती मिळवली होती.

तसेच बन्सल यांच्या तोंडून अनेक वेळा घरात किती पैसे आहेत याची माहिती त्याने ऐकली होती. त्यामुळेच त्याने चोरी करण्याचा कट रचला व त्यात जगदीशकुमारला सामावून घेतले. दि. 2 जानेवारी रोजी दुपारी रेशम बन्सल या एकट्या घरात असताना, गॅस सिलेंडर देण्याच्या बहाण्याने आरोपींनी घरात प्रवेश केला व बन्सल यांचा गळा आवळून खून केला. कपाटातील रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 82 हजाराचा मुद्देाल चोरून नेला.सहाय्यक पोलीस अधीक्षक, नवनीत काँवत, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक पद्माकर घनवट, यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराज पाटणकर, पोलीस नाईक अमोल कसबेकर, वैभव सुरवसे, पवन कराड, अजीज मेस्त्री, मनोज मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, हवालदार पी. एस. वाघमारे, सचिन गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 6

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds