";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोणावळा शहर पोलिसांनी दमदार कामगिरी

लोणावळा शहर पोलिसांनी दमदार कामगिरी

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 7 : बेकायदा दारू विक्री व वेश्याव्यवसायाशीसंबंधी दोन प्रकरणात लोणावळा शहर पोलिसांनी दमदार कामगिरी करत आरोपींना जेरबंद केले. लोणावळा शहरातील शेतकरी पुतळा चौक ते महावीर चौक दरम्यान बेकायदेशीरपणे दारूविक्री करण्याकरिता आलेल्या दोन जणांना दहा लाखांच्या मुद्देालासह अटक करण्यात आली. दोन वेगवेगळ्या प्रकरणात लोणावळा पोलिसांची कामगिरी बेकायदा दारू विक्री व वेश्याव्यवसायावर छापा ओंकार अनंत भंडारे (वय 19, रा. वरसोली टोलनाका) व रेश्मा शंकर पाठारे (वय 34, रा. दत्तमंदिरासमोर, औंढे, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम, 65 (ई) व 108 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस नाईक अमोल कसबेकर यांनी फिर्याद दिली आहे. मध्यंतरी खत्री फार्म वलवण, तसेच पांगळोली येथेदेखील पोलिसांनी छापे मारून बेकायदा दारू जप्त केली होती. भंडारे व पाठारे यांच्याकडून बियरचे 20 बॉक्स, देशी व विदेशी दारूच्या 436 बाटल्या व वाहन जप्त केले आहे. दुसर्‍या प्रकरणात वलवण येथील खत्रीपार्क सोसायटीत एका बंगल्यामध्ये वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी सखाराम तुकाराम पाटील (वय 39, रा. खत्री पार्क वलवण) याला अटक करण्यात आली आहे. सदर व्यक्ती महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. याआधारे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पृथ्वीराज ताटे, हवालदार हनुंत पासलकर, रऊफ इनामदार, ज्ञानेेशर क्षीरसागर, सुरेखा कोरपड, यांच्या पथकाने मंगळवारी शिवतीर्थ बंगला खत्री पार्क क्र. दोन येथे छापा टाकत आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बळीराम सांगळे करीत आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 27

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds