";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून...

पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून...

E-mail Print PDF

Add this to your website

 

विरार : आजवर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक जणांचे जीव गेले आहेत. मात्र विरारमध्ये चक्क रस्त्यावरील खड्डयामुळे एका हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावताना खड्ड्यात बाईक पडल्यानंतर हा बनाव उघडकीस आला.

पोटगीची रक्कम वाचवण्यासाठी एका रेल्वे कर्मचाऱ्याने घटस्फोटित पत्नीची हत्या करण्यासाठी अडीच लाखांची सुपारी दिली होती. महिलेला मारल्यानंतर मारेकरी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात होते. त्यावेळी रस्त्यावरच्या खड्डयात बाईक घसरली आणि हा संपूर्ण बनाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणला.

विरार पूर्वेकडील करजोण या गावातील बोदणपाडा येथे रस्त्यावर एका 54 वर्षीय महिलेचा मृतदेह विरार पोलिसांना सापडला. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवून सात आरोपींना अटक केली. मयत रमाबाई नामदेव पाटील ही विरारच्या नारंगीपाडा येथील रहिवाशी होती. तिचा पती नामदेव पाटील यानं दुसरं लग्न केलं होतं.

घटस्फोटाची केस सुरु असताना रमाबाई पोटगीची रक्कम नामदेवकडे मागत होती. नामदेव रेल्वेत कर्मचारी आहे. पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून, रमाबाईला ठार मारण्यासाठी करजोण गावाच्या पुढे राहणाऱ्या चंद्रकात पडवळेला त्याने  अडीच लाखांची सुपारी दिली. पडवळेने या कटात एका महिलेसह आणखीन पाच जणांना सामील केलं.

आरोपी वंदना पवारने 9 सप्टेंबरला रमाबाईला काम देण्याच्या बाहण्याने करजोण येथील एका फार्म हाऊसला बोलावलं. तिला रात्रीच्या वेळी गावठी कोंबडा कापून, चांगलं खाऊ-पिऊ घातलं आणि शेवटी तिचा नायलॉनच्या दोरीनं गळा  आवळून खून केला.

अंधार झाल्यावर आरोपींनी मयत रमाबाईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. दोघांनी मृत रमाबाईला बाईकवर मध्ये बसवून मृतदेहाची विल्हेवाट लावायला निघाले. मात्र तेवढ्यात बादणपाडा येथे रस्ता खराब असल्याने बाईकवरुन तिघेही पडले. कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने शेजारील गावकरी बाहेर आले. त्यामुळे दोघांनी मृतदेह तसाच टाकून पोबारा केला.

गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पती नामदेव पाटीलसह चंद्रकांत पडवळे, पांडुरंग कदम, लक्ष्मण कोबाड, लक्ष्मण पवार, राकेश पवार, वंदना पवार या सात जणांना अटक केली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 142

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds