";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- निर्दयी पित्याने मुलाला दिले मच्छर अगरबत्तीने 40 चटके, बाेबडा बाेलत असल्यामुळे राग

निर्दयी पित्याने मुलाला दिले मच्छर अगरबत्तीने 40 चटके, बाेबडा बाेलत असल्यामुळे राग

E-mail Print PDF

Add this to your website
 
 
निर्दयी पित्याने मुलाला दिले मच्छर अगरबत्तीने 40 चटके, बाेबडा बाेलत असल्यामुळे राग
नाशिक - मुलगा बोबडा बोलतो याचा राग अाल्याने निर्दयी पित्याने अवघ्या साडेतीन वर्षाच्या मुलाला मच्छर अगरबत्तीने तब्बल ४० चटके दिले. तत्पूर्वी विरोध करणाऱ्या पत्नीस त्याने मारहाण करून घराबाहेर काढून दिले. गुरुवारी रात्री गोंदे दुमाला फाटा येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून जखमी मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अघाेरी विद्या प्राप्त करण्यासाठी या पित्याने हा प्रकार केला असावा, असा संशयदेखील व्यक्त करण्यात येत अाहे. आघोरी विद्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गोंदेफाटा येथे हेमंत राऊत हा पत्नी आणि साडेतीन वर्षाचा मुलगा संस्कार यांच्यासह भाडेतत्वार राहतो. गुरुवारी रात्री संशयित हेमंत याने मुलगा बोबडा बोलतो, याचा राग अाल्यामुळे अाधी पत्नीला बेदम मारहाण करुन घराबाहेर हाकलले. आतून कडी लावून घेतली अाणि झोपेत असलेल्या लहानग्या संस्कारला मच्छर अगरबत्तीने चटका दिला. पहिला चटका बसल्यानंतर संस्कार ओरडतच जागा झाला आणि रडायला लागला. त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करत हेमंतने त्याच्या सर्वांगला चटके देणे सुरुच ठेवले. पत्नीने खिडकीतून हा प्रकार पाहिला अाणि मदतीसाठी आरडाओरड सुरू केली केली. मात्र कोणीच तिच्या मदतीला आले नाही. चटक्यांमुळे कोवळा संस्कार बेशुद्ध पडल्यानंतर सकाळी या निर्दयी पित्याने दरवाजा उघडला. तशाच अवस्थेत अाईने संस्कारला दवाखान्यात नेले. चटक्यांच्या जखम खोलवर असल्याने त्यास पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. याप्रकरणी संशयित हेमंत राऊत याच्याविरोधात वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताे फरार झाला आहे.
 
अघोरी विद्याचा प्रकार : हेमंत हा पेट्रोल पंपावर काम करतो. मुलगा बोबडा बोलत असल्यास त्याला चटके दिल्यानंतर स्पष्ट बोलतो, असा गैरसमज ग्रामीण आणि अदिवासी भागात आहे. या अंधश्रद्धेतून त्याने मुलाला चटके दिल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले. मात्र परिसरातील नागरिकांनी मात्र हा प्रकार त्याने अघाेरी विद्या प्राप्त करण्यासाठी केल्याची शंका व्यक्त केली.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 13

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds