";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शहरातील रस्त्यांसाठी आणखी 225 कोटी देतो, पण ते तरी वेळेत वापरा: मुख्यमंत्री फडणवीस

शहरातील रस्त्यांसाठी आणखी 225 कोटी देतो, पण ते तरी वेळेत वापरा: मुख्यमंत्री फडणवीस

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

  • औरंगाबाद- शहरातील रस्त्यांसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी १२५ कोटी व पुन्हा सत्तेत आल्यास आणखी १०० कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी औरंगाबादेत केली. मात्र, हा पैसा तरी वेळेत वापरा, असा सल्लाही त्यांनी महापालिकेच्या कारभाऱ्यांना दिला.

     

    शासनाने १८ महिन्यांपूर्वी दिलेल्या १०० कोटी रुपयांतून होणाऱ्या रस्ते कामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. नागपूरच्या तुलनेत औरंगाबादला सरकारने तुटपुंजा निधी दिला. प्राप्त निधीचाही मनपाने तातडीने वापर केला नाही, असे वृत्त 'दिव्य मराठी'ने ३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले. त्याच संदर्भात आमदार सुभाष झांबड म्हणाले की, आधीचे ६ महिने कोणत्या रस्त्यांची कामे करायची हे ठरवण्यात गेले, नंतरचे ६ महिने हे काम कोणाला द्यायचे यात गेले व पुढे कोर्टात दिवस वाया गेले.

    त्यावर फडणवीस म्हणाले, विलंब झाला हे खरे आहे, परंतु शहराचा विकास झाला पाहिजे. यापूर्वी १२५ कोटी रस्त्यांसाठी दिले होते. निवडणुकीपूर्वी पुन्हा तेवढेच पैसे देऊ. जनतेच्या आशिर्वादाने पुन्हा सरकार आले तर आणखी १०० कोटी मिळतील. सरकार पैसे देईल पण ते वेळेत खर्च झाले पाहिजे. त्याच्या कोर्ट कचेऱ्या होणार नाहीत, यासाठी पारदर्शक यंत्रणा उभी केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.

    बाजार समित्यांमुळेच हमीभाव मिळत नाही 
    केंद्राने दीडपट हमीभावाची घाेषणा करूनही राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याची टीका हाेत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे खापर बाजार समित्यांवर फाेडले आहे. 'काही बाजार समित्यांच्या कारभारामुळेच हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही', असा ठपका त्यांनी ठेवला. 

     
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 39

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds