";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- दाऊद इब्राहिमचा पंटर दानिश अली पोलिसांच्या ताब्यात

दाऊद इब्राहिमचा पंटर दानिश अली पोलिसांच्या ताब्यात

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

  • मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरसह तिघांना शस्त्र तस्करीप्रकरणी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अटक करण्यात आले होते. आरोपींचा ताबा मिळविण्यासाठी भारताकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नांना आता यश आले आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सोहेल कासकरचा खास सहकारी दानिश अली याचा पोलिसांना ताबा मिळाला आहे.

     

    दानिश सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिस कस्टडीत आहे. दानिशला 20 दिवसांसाठी ताबा मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे. दानिशच्या जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या अटकेबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती.

    सोहेल कासकरला भारतात आणणार..
    दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचण्याचे भारताचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी सोहेल कासकार याचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, भारतात सोहेल कासकर विरोधात एकही गुन्हा दाखल नाही आहे. परंतु कासकरच्या माध्यमातून दाऊदशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती सुरक्षा एजन्सीला मिळू शकते.

    दिल्लीचा राहणारा आहे दानिश
    दानिश हा दिल्लीचा राहणारा आहे. दिल्लीत जामा मशिद परिसरात त्याचे घर आहे. त्याचे वडील जामा मशिदीत साफ सफाईचे काम करतात. दानिशने अर्ध्यातच शिक्षण सोडले होते. 2001 मध्ये तो नोकरीच्या शोधात दुबईत गेला होता. तिथे त्याची ओळख सोहेल कासकर याच्याशी झाली होती. दानिश याने 3 वर्षे कासकरसोबत काम केले होते.

     
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 37

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds