";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

मंदिरात गळफास घेऊन चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

E-mail Print PDF

Add this to your website

 

चित्रपट निर्माते सदानंद ऊर्फ पप्पू लाड (51)यांनी लाडाचा गणपती मंदिरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती व त्यात एका विकासकाला जबाबदार धरल्याचे सूत्रांकडून समजते. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.ग्रॅण्ट रोडच्या मौलाना शौकत अली मार्गावर लाडाचा गणपतीचे मंदिर आहे.

सकाळी नऊ वाजता मंदिराचा दरवाजा उघडला असता पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या रस्सीने गळफास लावलेल्या अवस्थेत सदानंद लाड आढळून आले. त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले; पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच लाड यांचा मृत्यू झाला होता. लाड हे गायवाडीतील राजेंद्र मॅन्शनमध्ये राहत होते. त्यांनीच लाडाचा गणपती मंदिराची उभारणी केली होती. त्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. लाड हे चित्रपट निर्माते म्हणूनदेखील प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

सुसाईड नोटमध्ये बिल्डरचे नाव
पप्पू लाड यांनी आत्महत्येपूवी सुसाईड नोट लिहिली असून त्यात बिल्डर सिद्धार्थ ग्रुप आणि ताहीर भाई यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आत्महत्या करत आहे, असे म्हटले होते. पप्पू लाड यांचा मुलगा अंकुर याने बिल्डर आणि ताहीर भाई यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 29

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds