";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका, तुमच्या सोबत शिवसेना आहे- आदित्य ठाकरे

शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका, तुमच्या सोबत शिवसेना आहे- आदित्य ठाकरे

E-mail Print PDF

Add this to your website

Image result for aditya thackeray

देगलूर

दुष्काळाची दाहकता कितीही गंभीर असली तरी शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांचा सामना करण्यासाठी शिवसेना सदैव आपल्या सोबत असल्याचे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील पशुखाद्य वाटपाच्या निमित्ताने आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी आमदार सुभाष साबणे, आमदार हेमंत पाटील, तालुकाप्रमुख महेश पाटील, युवासेना जिल्हा युवाधिकारी विक्रम साबणे, संतोष पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व परिसरातील गावकरी, अधिकारी उपस्थित होते.

वन्नाळी गावच्या वेशीवर असलेल्या शेतकरी महिला सौ. शकुंतला भुमा कोरेवार, बाबू किशन अक्यमवार यांच्या गोठ्यात असलेल्या पशूंना पशूखाद्याचे वाटप युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी करुन पशुधनाची योग्य काळजी घ्या, असे सांगितले. उपस्थित शेतकऱ्यांचे डोळे पाणावले. एवढा मोठा माणूस आमच्या गुराढोरांची काळजी करतो, असे शेजाऱ्यांना सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना युवानेते आदित्य ठाकरे यांच्यासमोर वन्नाळीचे ज्येष्ठ नागरिक बाबाराव दशरथ पाटील आणि राजेंद्र इरन्ना कोरेवार यांनी आपले गाऱ्हाणे मांडून सन २०१६ च्या पिकविम्याची वंचित शेतकऱ्यांची रक्कम केवळ शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच मिळाल्याचे त्यांनी सांगितले व यंदा निम्या पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरिपाचे हंगाम गेले असून त्याचा विमा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.

शिवसेना ही नेहमीच समाजातील सर्वसामान्य घटकांना केंद्रबिंदू ठरवून राजकारण करीत आली आहे. समाज कार्यातून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सतत झटण्याची कार्यपध्दती जुनी आहे. सध्याच्या स्थितीत दुष्काळाची दाहकता गंभीर असली तरी शिवसेना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून आपल्या समस्या आमदारांकडे कळवाव्यात, असे सांगून अशा कठीण प्रसंगी आत्महत्येचा विचार न करता शिवसेनेचा विचार करावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

यावेळी महेश पाटील, विक्रम, संतोष पाटील, सचिन पाटील, महादेव माका, अवधूत, व्यंकट माका, स्थानिक बसवंत गाडले, विजय पाटील, गणेश पाटील, गोविंद पाटील, बाबाराव पाटील, संजय जोशी, पुरुषोत्तम अन्सापूरे, व्यंकट आलुरे, गंगारेड्डी यालावार, प्रकाश लोकावार, किशन पाटील, संतोष भुपनवार, अमोल चिंतलवार, राकेश अच्यनगार, राकेश इल्तेपवार, धोडींबा गायकवाड, जगदीश मठपती, हणमलू कोतावार, मनोज कोटगिरे, मनोज मुस्कावार, प्रशांत कोत्तावार, रुपेश मिठापल्ले, गंगारेड्डी मलडवार, हणमंत, संतोष यनगूलवार आदी उपस्थित होते.

 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 18

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds