";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- भाजपमध्ये प्रवेश का टाळला?

भाजपमध्ये प्रवेश का टाळला?

E-mail Print PDF

Add this to your website

मुंबई: राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आजचा प्रवेश टळला आहे. राधाकृष्ण विखे पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे खुद्द त्यांचे पुत्र व भाजपचे नगरमधील लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, राधाकृष्ण विखे आज भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, विखेंनी आपला भाजप प्रवेश मुद्दाम टाळल्याची माहिती आहे. विखे यांनी अद्याप विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही. विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असल्याने त्याचा राजीनामा न दिल्याने त्यांनी भाजप प्रवेश टाळला आहे. मात्र, खरे कारण वेगळेच असल्याची चर्चा आहे.

राधाकृष्ण विखे कौटुंबिक वादाने त्रस्त

राधाकृष्ण विखे यांच्या कुटुंबियातील वाद चव्हाट्यावर आलेले आहेत. गेल्या दोन वर्षापासून राधाकृष्ण आणि त्यांचे थोरले बंधू अशोक विखे यांच्यात कौटुंबिक संस्था व मालकी यावरून वाद सुरू आहे. बाळासाहेब विखेंच्या निधनानंतर राधाकृष्ण यांनी सर्व सहकारी, मालकी संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. याविरोधात अशोक विखेंनी विविध स्तरावर किमान ४०-५० तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीला भाजप सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोपही अशोक विखेंनी केला आहे. सोबत अशोक विखेंनी पवारांशी संधान बांधले आहे. अशा स्थितीत केंद्रात असो की राज्यात सत्ताबदल झाल्यास राधाकृष्ण यांना मोठे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे राधाकृष्ण यांनी सावध भूमिका घेत सध्या तरी काँग्रेसमध्येच राहणार असल्याची माहिती कळते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 5

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds