";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- भिकाऱ्याच्या खात्यावर तब्बल सव्वा लाख, ‘नॉमिनी’ माजी उपमहापौर धिल्लन

भिकाऱ्याच्या खात्यावर तब्बल सव्वा लाख, ‘नॉमिनी’ माजी उपमहापौर धिल्लन

E-mail Print PDF

Add this to your website

 

औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागणाऱ्या दर्शनसिंग जुगलकिशोरसिंग (७२) यांचा १३ सप्टेंबरला ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या भिकाऱ्याचे टपाल कार्यालयात खाते असून त्यात एक लाख १९ हजार ५६७ रुपयेही आहेत. मृतदेह ताब्यात देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाइकांचा शोध घेतला तर पोस्टाच्या खात्यावर माजी उपमहापौर तरविंदरसिंग धिल्लन ‘नॉमिनी’ असल्याचे कळाले. तत्पूर्वी दूरध्वनीद्वारे त्यांनी धिल्लन यांच्याशी संपर्क केला, तर धिल्लन यांनी त्यांच्याशी ओळख होती, पण जवळचे संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

रेल्वे स्टेशन येथील संत गाडगे महाराज शहरी बेघर निवारागृहात २०१५ पासून आश्रयाला असलेले दर्शनसिंग मूळचे पंजाब येथील जालंधरचे रहिवासी होते. रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागून आपली उपजीविका करणाऱ्या दर्शनसिंग यांना गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘ब्रेन हॅमरेजचा अटॅक’ आला. निवारागृहातील अधीक्षक सुंदर लोडवणे आणि केअर टेकर अक्षय वाघमारे यांनी घाटीच्या अपघात विभागात दाखल केले. बोधी ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रशांत दंदे आणि डॉ. रंजना दंदे यांनी शहरातील अनेक निवारागृहातील बेघरांची जबाबदारी घेतलेली असल्यामुळे सुंदर आणि अक्षय यांनी त्यांना फोन करून माहिती दिली. प्रा. दंदे यांनी सीटी स्कॅन करून रिपोर्ट घेतल्यावर लक्षात आले की, ब्रेन हॅमरेज झाले, अन् प्रचंड जास्त रक्तस्राव झाला आहे. उर्वरित पान.६

पोस्टात कळाले की, धिल्लनच नॉमिनी बेघर निवारागृहात कार्यकर्त्यांनी दर्शनसिंग यांची पेटी पाहिली तर त्यामध्ये पोस्ट ऑफिसचे पासबुक निघाले. त्यामध्ये आठ दिवसांपूर्वी दर्शनसिंग यांनी २० हजार रुपये काढल्याची नोंद होती. त्याशिवाय १ लाख १९ हजार ५६७ रुपये खात्यावर असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नॉमिनी कोण आहे..? त्याच्या संपर्कासाठी मोबाइल क्रमांक पोस्टातील अधिकाऱ्यांकडे मागितला तर त्यांनीही धिल्लनच नॉमिनी असल्याचे सांगत पुरावाच दिला. शेवटी मृतदेह कुणीही ताब्यात घेणारे नसल्यामुळे १४ सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.

अाधार कार्ड काढल्यामुळे माझा पत्ता दिला : मी त्यांना अोळखत होतो. त्यांनी म्हटले की, अाधार कार्ड काढून द्या. अाता राजकारणात असल्यामुळे सर्वांना मदत करावीच लागते, तशी त्यांनाही केली. मग काय..? अाधारवरील पत्त्यामुळे माझ्या घरचा पत्ता दिला अन् मलाच नाॅमिनी केले असेल. - तरविंदरसिंग धिल्लन, माजी उपमहापौर

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 75

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds