";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अभ्यासावरून मोठी बहीण रागावल्यामुळे 14 वर्षीय मुलीची विहिरीत आत्महत्या

अभ्यासावरून मोठी बहीण रागावल्यामुळे 14 वर्षीय मुलीची विहिरीत आत्महत्या

E-mail Print PDF

Add this to your website

 

औरंगाबाद - अभ्यास करण्यावरून बहीण रागवल्यामुळे बेपत्ता झालेली १४ वर्षीय मुलगी हडको एन-११ येथील स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यानातील विहिरीत मृतावस्थेत आढळली. रागाच्या भरात तिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शिल्पा रामकुमार धनगावकर (रा. सुदर्शननगर) असे मृत मुलीचे नाव आहे.

मनपा शाळेत आठवीत शिकणारी शिल्पा आई, मोठा भाऊ व बहिणीसोबत राहत होती. सहा वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झालेले आहे. बुधवारी रात्री शिल्पा घरातून बाहेर गेली. परंतु नंतर ती घरी परतलीच नाही. शुक्रवारी उद्यानात नागरिक फिरण्यासाठी गेले असता त्यांना मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. ती शिल्पाच असल्याचे समोर आले. घटनेची माहिती कळताच सिडको पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने तिचा मृतदेह बाहेर काढून घाटीत पाठवला.

बेपत्ता झाल्याची तक्रार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाचा बुधवारी मोठ्या बहिणीसोबत अभ्यासावरून वाद झाला होता. शाळेचा अभ्यास करत नसल्याने मोठी बहीण तिला रागावली होती. त्याचा राग आल्याने शिल्पाने घर सोडले. रात्री उशिरापर्यंत ती परतलीच नाही. त्यामुळे बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तिच्या मोठ्या भावाने सिडको पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

विहिरीला जाळी नाही, नागरिकांच्या तक्रारी शहरातील बहुतांश विहिरींना लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. परंतु दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या विहिरीला नागरी वसाहतीत असूनही अद्याप सुरक्षा जाळी बसवण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून विहिरीतील पाणी वाढले होते. या उद्यानात नेहमी टवाळखोरांचा वावर असल्याच्यादेखील स्थानिकांच्या तक्रारी आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 29

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds