";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ठाणे येथील युवा उद्योजकाचा खून, गांजा ओढताना रोखल्याने चार जणांनी भोसकले

ठाणे येथील युवा उद्योजकाचा खून, गांजा ओढताना रोखल्याने चार जणांनी भोसकले

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मुंबई - ठाणे येथे एका युवा उद्योजकाचा खून करण्यात आल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी जारी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय उद्योजकाने मंगळवारी आपल्या परिसरात गांजा ओढणाऱ्यांचा विरोध केला. याच दरम्यान झालेल्या बाचा-बाचीत चौघांनी मिळून त्याचा खून केला. ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आली आहे. दिलीप विनोद मारवाडी असे मृतकाचे नाव असून तो एक जीन्स कारखान्याचा मालक होता.

दिलीप मंगळवारी रात्री घरी येण्याच्या तयारी असताना त्याला आपल्या कारखाना परिसरात 4 जण गांजा ओढताना दिसून आले. त्याने या लोकांजवळ जाऊन चौकशी केली आणि त्यांना दुसरीकडे जाण्याचे आवाहन केले. त्याचाच चौघांना इतका राग आला की त्यापैकी दोघांनी चाकू काढले आणि दिलीपवर एकानंतर एक प्रहार सुरू केले. दिलीपच्या किंकाळ्या ऐकून आसपासचे लोक गोळा झाले. लोकांची गर्दी झाल्यानंतरही आरोपी त्याच ठिकाणी बसले होते. या हल्ल्यात दिलीपचा मृत्यू झाला. तसेच घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले. या चौघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 18

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds