";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- बीएस्सी शिकणाऱ्या अनयने बनवली पेट्रोलवर चालणारी फोरस्ट्रोक सायकल, जपानमधून मागवले इंजिन

बीएस्सी शिकणाऱ्या अनयने बनवली पेट्रोलवर चालणारी फोरस्ट्रोक सायकल, जपानमधून मागवले इंजिन

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

औरंगाबाद- शारीरिक तंदुरुस्ती, वेळ पडल्यावर मिळणारा वेग आणि वाढत्या खर्चाला आळा बसावा या तिहेरी उद्देशाने शहरातील एका महाविद्यालयीन युवकाने चक्क पेट्रोलवर चालणारी फोरस्ट्रोक सायकल तयार केली आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल ९५ किमी अॅव्हरेज देणारी त्याची ही भन्नाट सायकल खरोखर सर्वांगाने अफलातून अशीच आहे. खटपटी स्वभावाच्या या युवकाने तयार केलेली ही सायकल कमीत कमी प्रदूषण करते.

शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये अनय जोशी हा बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच जगावेगळे काहीतरी करण्याची त्याची सवय. बारावीनंतर लांब असलेल्या कॉलेजात लवकर व कमी खर्चात जाता यावे म्हणून काहीतरी केलेच पाहिजे या विचारात तो होता. त्यातच त्याला ही कल्पना सुचली. कारण शेवटी गरज ही शोधाची जननी असते म्हणतात. तेच सूत्र या ठिकाणीही लागू पडले. प्रतिभाशक्ती जागृत झाली आणि हा आविष्कार झाला.

वडिलांसोबत पालथा घातला रविवार बाजार :

ही सायकल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पार्टची गरज होती. शहरातील दुकाने, गॅरेज आणि रविवारच्या बाजारातून वेगवेगळे पार्ट त्याने खरेदी केेले. यासाठी त्याला वडील शशिकांत जोशी यांनी मोलाची साथ दिली. या दोघांनी रविवार बाजार पालथा घालून हे पार्ट मिळवले. पेट्रोलची टाकी फक्त त्यांना तयार करून घ्यावी लागली.

जपानमधून मागवले इंजिन : अनयने यासाठी लागणारे इंजिन त्याने जपानमधून मागवले. या इंजिनची घरीच सायकलला फिटिंग केली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 23

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds