";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- 'प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही...', अमरावतीमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी घेतली अनोखी शपथ

'प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही...', अमरावतीमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी घेतली अनोखी शपथ

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

अमरावती- चांदूर रेल्वे येथील महिला महाविद्यालयातील तरुणींनी "प्रेम विवाह न करण्याची शपथ' घेतली. तालुक्यातील टेंभूर्णी येथे सुरू असलेल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांनी विद्यार्थिनींना ही शपथ दिली. व्हॅलेंटाईन दिवसाच्या अनुषंगाने तरुणींनी घेतलेली शपथ चर्चेचा विषय ठरत आहे.

तरुण मुलींवर हत्या, अॅसिड हल्ले, अश्या सभोवताल घडणाऱ्या घटना लक्षात घेता प्रेमाची परिणती हत्तेत होत असेल, तर ते प्रेम कसले? त्यामुळे माझा माझ्या आईबाबावर विश्वास ठेवत महाविद्यालयीन मुलींनी प्रेम विवाह न करण्याची तसेच हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न न करण्याची शपथ घेतली. एवढेच नव्हे तर दोन पाऊल पुढे जात सध्याच्या रीतीरिवाजानुसार कुटुंबाने माझे लग्न हुंडा देवून लग्न लावले तर भावी पीढीतिल एक माता म्हणून माझ्या होणाऱ्या सुने कडून हुंडा घेणार नाही व मूलीसाठी हुंडा देणार नाही अशीही शपथ घेतली.

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदुर रेल्वे या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर ग्राम टेंभूर्णी येथे सुरू आहे. त्या शिबिरात 'युवकांपुढील आव्हाने' या विषयावर उद्बोधन सुरू असताना सत्राचे अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. प्रदीप दंदे यांनी युवकांपुढे अनेक आव्हान असताना "मुलींवरील वाढते अत्याचार हे सुद्धा एक आवाहन आहे. असे सांगत एक घटना घडल्यावर दुसरी होणार नाही, असे वाटत असताना लगेच प्रेम प्रकरणाच्या अनेक घटना घडताना दिसून येतात. मुलींचा आपल्या आई बाबावर लग्न करून देणार नाही असा विश्वास नाही का? असा प्रश्न विद्यार्थिनींना केला. त्यातून ही शपथ देण्यात आली.

या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजाभाऊ देशमुख महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्यारेलाल सूर्यवंशी, विशेष निमंत्रित म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक पळवेकर, प्राचार्य राजेंद्र हावरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विजय कापसे, सहकार्यक्रम अधिकारी ग्रंथपाल मीना देशमुख, प्रा. सीमा जगताप, प्रा. संजीव भूयार जीवन शेळके, प्रा. नितिन अंभोरे, प्रा. लक्ष्मण सोलंके, प्रा. वैशाली देशमुख प्रा. कु. नेहा इंगळे उपस्थित होते. या वेळी शिबिरातील विद्यार्थिनी श्रेया वऱ्हेकर, भावना तायडे, मृणाल पाचखेडे, वैष्णवी गोखे, श्रेया जैन, अर्चना जैन, निशा नाईक, रूचिता रंगारी, पल्लवी सदबोरे, तेजस्वी बोबडे, भुवनेश्वरी देशमुख, अंकिता वानखडे, संगीता साउतकर या शिबिरार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 22

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds