";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ‘स्त्रीचा पुरुष झालो तो दुसरा जन्म, नव्या आयुष्याची आता खरी सुरुवात; 27 वर्षे स्त्री म्हणून जगलो’

‘स्त्रीचा पुरुष झालो तो दुसरा जन्म, नव्या आयुष्याची आता खरी सुरुवात; 27 वर्षे स्त्री म्हणून जगलो’

E-mail Print PDF

Add this to your website

 

बीड - ललिता म्हणून आयुष्याची २७ वर्षे काढल्यानंतर स्वत:मध्ये होणाऱ्या पुरुषी बदलांमुळे लिंगबदल शस्त्रक्रिया करवून घेत पुरुष झालेल्या माजलगाव येथील पोलिस कर्मचारी ललितकुमार साळवे रविवारी लग्नाच्या ‘बेडीत’ अडकला. औरंगाबाद येथील वधूशी त्याचा विवाह पार पडला. ‘स्त्रीचा पुरुष झालो हा माझा दुसरा जन्म होता, आता नव्या आयुष्याची सुरुवात झाली’, अशी लग्नानंतर पहिली प्रतिक्रिया त्याने ‘दिली.

माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील ललितकुमार हे पूर्वाश्रमीचे ललिता साळवे. २०१० मध्ये महिला म्हणून ते पोलिस दलात भरती झाले. पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून त्यांनी अनेक पदके पटकावली. दरम्यान, स्वत:मध्ये पुरुषी बदल होत असल्याचे त्यांना जाणवले होते. मात्र, ही बाब कुटुंबाला सांगायलाही त्यांना दोन, तीन वर्षे मनाची तयारी करावी लागली. अखेर १७ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांनी बीडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागितली आणि शस्त्रक्रियेनंतर पुरुष म्हणून पोलिस दलात नोकरी कायम ठेवण्याची मागणी केली आणि ललितकुमार साळवे देशभरात चर्चेत आले.

सर्वांचे मनपरिवर्तन करून लिंगपरिवर्तन : ललित सांगतात, आधी मनाची तयारी करून आपल्याला पुरुष व्हायचेय हेच कुटुंबाला पटवून देणे दिव्य होते. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा प्रशासनाचा होता. लिंगबदल करून मला नोकरीही कायम ठेवायची होती आणि यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया करूनच लिंगबदल करण्याचा निर्णय मी घेतला होता. पोलिस दलात अशा प्रकारे कुणी लिंगपरिवर्तन केले नसल्याने महासंचालकांनी लिंगबदलाला परवानगी नाकारली. त्यानंतर मी मुंबईचे अॅड. एजाज नक्वींमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. मॅटमध्ये गेलो. दरम्यानच्या काळात माध्यमांनी माझा संघर्ष पुढे आणला. तेव्हाचे मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनीही माझ्या अर्जाचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याचे निर्देश दिले. सप्टेंबर २०१७ ते मे २०१८ असा ९ महिने माझा संघर्ष सुरू होता. यानंतर मला लिंगबदलाला परवानगी दिली गेली आणि पुरुष गटातून मला विशेष बाब म्हणून पोलिस दलातील माझी सेवाही कायम ठेवली गेली.

...अन् लग्नाच्या बेडीत

सीमाला माझ्या लिंगबदल शस्त्रक्रियेची पूर्ण कल्पना आहे. शिवाय, एका कार्यक्रमात तिने मला पाहिले होते. मी मुलींसारखा न दिसता पुरुष दिसतो हे पाहूनच तिने लग्नाला होकार दिला. आैरंगाबाद येथे रविवारी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

गावकरी, सहकाऱ्यांचे पाठबळ

या सगळ्या प्रक्रियेत राजेगाव, माजलगावकर नागरिक, पोलिस अधिकारी, सहकारी यांचा मोठा पाठिंबा होता. पहिली शस्त्रक्रिया करून आल्यानंतर गावकऱ्यांनी माझी मिरवणूक काढली, रांगोळ्या काढल्या, कपडे देऊन सत्कार केला. हाच अनुभव पोलिस ठाण्यात रुजू होतानाही आला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 73

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds