";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ‘नकोशी’ला फेकणाऱ्या कुमारी मातेला अटक, धनंजय मुंडेंनी स्वीकारले ‘शिवकन्ये’चे पालकत्व

‘नकोशी’ला फेकणाऱ्या कुमारी मातेला अटक, धनंजय मुंडेंनी स्वीकारले ‘शिवकन्ये’चे पालकत्व

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

परळी - शहरातील भीमनगर भागात रात्रीच्या वेळी प्रेम प्रकरणातून जन्मलेल्या तान्ह्या मुलीला रेल्वे रुळाजवळ काटेरी झुडपात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस उघडकीस अाला. येथील संभाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून मंगळवारी १७ वर्षाच्या कुमारी मातेस ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून जन्मलेल्या अर्भकाला फेकून दिल्याची कबुली तिने दिली आहे. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे व खासदार सुप्रिया सुळे यांनी तान्ह्या मुलीचे पालकत्व स्वीकारले असून तिचे नाव ‘शिवकन्या’ ठेवले आहे.

परळी शहरातील भीमनगर भागात सिमेंट फॅक्टरीकडे जात असलेल्या रेल्वे पटरीवर सोमवारी (दि. २४) रात्री साडेआठ वाजता एका काटेरी झुडुपात स्त्री जातीचे जिवंत अर्भक रडत असल्याचा आवाज आला. जाफर खान अफसर खान व इतरांनी घटनास्थळाकडे गेल्यानंतर त्यांना हे स्त्री जातीचे अर्भक दिसून आले. त्यांनी तातडीने बालिकेस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. या प्रकरणी जाफर खान यांच्या तक्रारीवरून संभाजीनगर ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मंगळवारी सकाळी अल्पवयीन मातेस ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता हा प्रकार प्रेम संबंधातून घडला असल्याची कबुली दिली. पोलिस आता संबंधित प्रियकरावर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले. जखमी अवस्थेतील त्या बालिकेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अर्भकाची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धनंजय व सुप्रिया यांनी स्वीकारले पालकत्व

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे व खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या अर्भकाची जबाबदारी घेतली. बाळाची तब्येत सुरळीत होताच तिला पुण्यातील सर्व सोयीयुक्त बालिकाश्रमात हलवण्यात येणार आहे. पुढील संगोपन, शिक्षण ते लग्नाचीही संपूर्ण जबाबदारी आमची असेल असेही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 19

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds