";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- जागतिक महिला दिनीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ

जागतिक महिला दिनीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील जयपुर येथे एका महिलेने रविवारी (ता. 8) दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जागतिक महिला दिनीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर आत्महत्येचे नमके कारण समजू शकले नाही.

सेनगाव तालुक्यातील जयपुर येेथे अंकुश लांभाडे यांचे कुटुंब राहते. घरी पत्नी व दोन मुली असून आई, वडिल गावातच इतर ठिकाणी राहतात. अंकुश लांभाडे यांच्या नावे तीन एकर शेती असून या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या दोन्ही मुली आजी-आजोबा कडेच रहतात. आज सकाळी लांभाडे हे शेतात कामासाठी गेले होते. घरी कोणी नाही हे पाहून त्यांची पत्नी उमा अंकुश लांभाडे (32) यांनी दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास घराचे दरवाजे आतून बंद करून घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या वेळी त्यांच्या मुलींनी दरवाजा वाजला असता आतून आवाज येत नव्हता. त्यामुळे त्यांनी हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला.

शेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांनीही आवाज दिले, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी अंकुश लांभाडे यांना निरोप दिला ते देखील तातडीने घरी आले. त्यानंतर गावकऱ्यांनी दरवाज्या तोडून पाहिले असता उमा लांभाडे यांचा मृतदेह गळफास घेतलेेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकरणी पोलिस पाटील अमरदास पारीसकर यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली. सेनगावचे उपनिरीक्षक बाबुराव जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कऱ्हाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र उमा लांभाडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. जागतीक महिला दिनी झालेल्या या घटनेमुळे सेनगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 8

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds