";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुंबईत फक्त 8 दिवसांत उभी केली बनावट सॅनिटाइझरची फॅक्टरी, लाखोंचे सामान जप्त; अन्न व औषध विभागाची कारवाई

मुंबईत फक्त 8 दिवसांत उभी केली बनावट सॅनिटाइझरची फॅक्टरी, लाखोंचे सामान जप्त; अन्न व औषध विभागाची कारवाई

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मुंबई - एकीकडे देशात कोरोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीचा लाभ घेणाऱ्यांची कमतरता नाही. गुरुवारी मुंबईच्या वाकोलामध्ये पोलिसांनी बनावट सॅनिटाइझर बनवणाऱ्या फॅक्टरीचा भंडाफोड केला. संस्कार आयुर्वेद नावाची सॅनिटाइझर तयार करणारी फॅक्टरी 8 दिवसांपासून सुरू केल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी 4 लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे.

उत्पादनावर कोणताही परवाना किंवा बॅच क्रमांक नाही; एफडीएच्या छापेमारीने खुलासा

मुंबईच्या अन्न व औषध विभागाने (एफडीए) वाकोला येथील संस्कार आयुर्वेद या फॅक्टरीत छापेमारी करत मोठ्या प्रमाणात बनावट सॅनिटाइझर जप्त केले आहे. एफडीएचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले की, "सदरील कंपनी विनापरवागनी सॅनिटाइझर तयार करत होती. या कंपनीची स्थापना 8 दिवसांपूर्वी बनावट मार्गाने केली गेली होती. कंपनीच्या फॅक्टरीत मिळालेल्या सॅनिटाइझर बॉटल्सवर लायसेन्स नंबर किंवा बॅच नंबर नव्हते." दरम्यान, ही कंपनी 'मेड इन वकोला' या नावाने बनावट सॅनिटायझर्सची विक्री करीत असल्याचे एफडीएच्या तपासणीत असे दिसून आले आहे.

फक्त पाणी आणि केमिकलद्वारे तयार करत होते सॅनिटाइझर

हे बनावट सॅनिटाइझर बाजारात 105 ते 190 रुपयांपर्यंत विकले जात होते. यामध्ये पाणी आणि निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरण्यात येत होता. चिंतेची बाब म्हणजे, कोणत्याही तपासणीशिवाय वैद्यकीय स्टोअर्समध्ये बिनधास्तपणे ग्राहकांना हे बनावट सेनेटिझर्स विकले जात आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 5

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds