";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 39, सोमवारी 6 नवे रुग्ण सापडले; देशात एकूण 118 कोरोनाग्रस्त

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 39, सोमवारी 6 नवे रुग्ण सापडले; देशात एकूण 118 कोरोनाग्रस्त

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मुंबई / नवी दिल्ली - महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 6 नवे रुग्ण सापडले. पुण्यात आणखी एक कोरोना रुग्ण मिळून आला आहे. आबुधाबी येथून प्रवासी पुण्यात आला होता, यासोबतच राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 39 झाली आहे. यात पुणे, मुंबई आणि औरंगाबादच्या एका नवीन रुग्णाचा समावेश आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना राज्यातील परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, वैद्यकीय नमुने तपासणीसाठी राज्यात लॅबची संख्या वाढवण्यात येत आहे. सोबतच, एमपीएससी परीक्षाही पुढे ढकलण्याची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ३३ रुग्णांना विषाणूबाधा झाल्याचे निदान झाले तरी ते गंभीर नाहीत. यातील १८ परदेशातून आलेले असून त्यांच्यामुळे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या १४ आहे. हे संक्रमण किती पसरले आहे याची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याचे टोपे म्हणाले. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात नवी उपकरणे मागवली असून बुधवारपासून दिवसाला ३५० जणांची तपासणी येथे करता येणार आहे. येत्या १५ ते २० दिवसांत मुंबई, पुण्यात नवीन लॅब सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंत्रणा सज्ज असल्याचे टोपे म्हणाले.

औरंगाबादेत पाॅझिटिव्ह रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार :

येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५९ वर्षीय महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांसह संपूर्ण यंत्रणेनेच तपासणी केली. सुदैवाने या महिलेची प्रकृती स्थिर असून ती उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. त्या प्राध्यापिका असून २३ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान रशिया व कझाकिस्तानला गेल्या हाेत्या. ३ मार्चला दिल्लीत परतल्यावर विमानतळावर स्क्रीनिंगही करण्यात आले. मात्र त्यात काेराेनाची लक्षणे आढळली नव्हती.

विदर्भ : बुलडाण्याचा ‘तो’ मृत रुग्ण कोरोना निगेटिव्ह

बुलडाणा | १४ मार्च रोजी दगावलेल्या एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्याचा मृत्यू श्वसनसंस्थेच्या आजारामुळे झाला आहे. सौदीतून मुंबईत आल्यावर एक वृद्ध दांपत्य गावाकडे गेले. यातील वृद्धास मधुमेह, रक्तदाब व श्वसनविकाराच्या त्रासामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

> अकोला येथे एका संशयित रुग्णाने तपासणीपूर्वीच केले रुग्णालयातून पलायन

> नागपूर विमानतळावर ९५७ प्रवाशांचे स्क्रीनिंग.

> अमरावतीत एक, तर यवतमाळ येथे दोन संशयित रुग्ण आढळले.

सरकारचे आदेश धाब्यावर : भुजबळांची उद्घाटन कार्यक्रमास हजेरी

पुणे - कोरोनामुळे शाळा, कॉलेज, मॉल बंद आहेत. सार्वजनिक कार्यक्रम रद्द असताना रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी हडपसर येथे शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले. तेथे सुमारे दीड हजार लोक होते. मात्र आपण महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले. सभा घेतली नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू :

मुंबईत जमावबंदी कलम १४४ लागू. मुंबईतील टूर ऑपरेटर्सना ३१ मार्चपर्यंत कोणत्याही टूर्सचे आयोजन करू नये अशा सूचना.

> १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व सिनेमा, टीव्ही शो, जाहिराती, वेब शोचे शूटिंग बंद करण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजसह इतर संघटनांनी घेतला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 5

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds