";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- चिन्मय उदगीरकर-गिरीजा जोशीचं झालं शुभमंगल

चिन्मय उदगीरकर-गिरीजा जोशीचं झालं शुभमंगल


Add this to your website

PHOTOS: चिन्मय उदगीरकर-गिरीजा जोशीचं झालं शुभमंगल,लग्नाला आली ‘नांदा...’ची टीम

अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री गिरीजा जोशी ह्यांचं शुभमंगल रविवारी ठाण्यात झालं. सकाळी ११ वाजताच्या मुहूर्तावर वैदिक पध्दतीने दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाला आलेल्या पाहूण्यांमध्ये ‘नांदा सौख्य भरे’च्या स्वानंदी, ललिता, वच्छी मावशी, आजी, काकू,सह मालिकेशी निगडीत अन्य कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री मधुरा वेलणकर ही गिरीजा जोशीची मावसबहिण असल्याने प्रदिप वेलणकर, मधुरा वेलणकर-साटम आणि अभिजीत साटमही लग्नाला उपस्थित होते.
 
लग्नाच्या मुहूर्ताच्यावेळी पिवळ्या रंगाची आणि हिरवे काठ असलेली नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात लक्ष्मीहार आणि मोत्याचे दागिने घालून गिरीजा जोशी सजली होती. तर चिन्मय उदगीरकरने गडद जांभळ्या रंगाचा सूट घातला होता. लग्नघटिकेवेळी ‘शुभमंगल सावधान’ मंत्रोच्चार कानावर पडताच इतर नववधूंप्रमाणेच बाकीवेळी हसतमुख असलेल्या गिरीजाच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. पण अर्थातच तिला चिन्मयने सावरलं.
 
सप्तपदीवेळी चिन्मयने पितांबर आणि उपरणं तर गिरीजाने साऊथ स्टाइलची मोतिया रंगाची पट्टू साडी नेसली होती. तर रिसेप्शनवेळी गिरीजाने केशरी-गोल्डन रंगाची डिझाइनर लहंगा-चोली घातली होती. आणि चिन्मयने कुर्ता-पायजमा घातला होता.
 
नववधू म्हटली की, हातभर मेहंदी ही हवीच. पण गिरीजा जोशीने मात्र हाताच्या तळव्यावर एक छोटाशी गोलाकार मेहंदी काढली होती. “मी सध्या अभिराम भडकमकरांची फिल्म करतेय. लग्नासाठी आठ दिवसांची सुट्टी घेतलीय. पुढच्या आठवड्यात पून्हा शुटिंग सुरू होणार. त्यामूळे मेहंदी काढली असती तर ती जर आठ दिवसात गेली नसती, तर शुटिंगमध्ये चांगलं दिसणार नाही. पण नववधू असल्याने थोडीशी काढणं आवश्यक होतं. म्हणून कळव्यावर अगदी शास्त्र म्हणून छोटीशी गोलाकार मेहंदी काढलीय.”
 
गिरीजा आणि चिन्मय सेलिब्रिटी आहेतच. पण चिन्मयच्या लग्नात ‘नांदा सौख्य भरे’च्या कलाकारांची टिम मुख्य आकर्षण होती. मालिकेत विळ्या-भोपळ्याचं नातं असलेल्या ललिता-वच्छी- स्वानंदी एकत्र फिरत असल्याने त्यांना पाहणं आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढणं हा व-हाडी मंडळींचा कार्यक्रम अविरत सुरू होता.
 
जवळ-जवळ ३००-४०० जणांसोबत सेल्फी काढल्यावर अभिनेत्री ऋतुजा बागवेला तू दमली नाहीस का? असं विचारल्यावर ती म्हणाली, “चिन्मयच्या लग्नाला येताना मी मला इथे आल्यावर व-हाडी मंडळींसोबत सेल्फी काढायला लागणार ह्याची मनाने तयारी करूनच आले होते. काही दिवसांपूर्वी एका ओळखीच्यांच्या लग्नात गेले तेव्हा पहिल्यांदा सातत्याने फोटो काढण्याचा अनुभव आला, तर बिचकलेच. पण त्या अनुभवानंचर कंटाळा न करता सगळ्या फॅन्ससोबत सेल्फी काढायचीच, अशी मनाची तयारी करूनच आता अशी पब्लिक फंक्शन्स मी अटेंड करते.”
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 421

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds