";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- अभिनेत्री मृणाल दुसानीस नुकतीच विवाहबंधनात अडकली

अभिनेत्री मृणाल दुसानीस नुकतीच विवाहबंधनात अडकली


Add this to your website

मृणाल दुसानिसचे मराठमोळ्या थाटात झाले शुभमंगल, पाहा Wedding Album

एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मृणाल दुसानीस नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. अमेरिकास्थित नीरज मोरे याच्याशी मृणालचा विवाह झाला आहे. 25 तारखेला नाशिकमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मुळचा पुण्याचा असलेला नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या लग्नाला असं सासर सुरेख बाई या मालिकेतील मृणालच्या सहकलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता संतोष जुवेकरसह अनेक कलाकारांनी मृणालच्या लग्नात उपस्थिती लावली होती. मराठमोळ्या थाटात हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी केवळ पुरुषच नव्हे तर सर्व महिलासुद्धा फेटा घालून दिसल्या. छोट्या पडद्यावर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’ या मृणालच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. शिवाय ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’मध्ये तिचा डान्सही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
 
कशी झाली मृणाल-नीरजची पहिली भेट... 
मृणाल लॉस एजंलिस येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त गेली असताना नीरज मोरेसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर त्यांचा संवांद फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून वाढला. दोघांचे कुटुंबीय आणि विचारांची देवाण-घेवाण झाल्यावर लग्न ठरलं. मृणाल मूळची नाशिकची तर नीरज पुण्याचा आहे. पुण्यात दोघांच्या चहा पोह्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मी आणि तो फोनवर आणि ऑनलाईन बोलत होतो. काही दिवसानंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, असे मृणालने सांगितले.
 
दोन वर्षे अमेरिकेत राहणारेय मृणाल... 
नीरजचे कुटुंब पुण्यात राहत असले तरी तो गेल्या सहा वर्षांपासून अमेरिकेतच राहतो. अमेरिकतून एमएस केल्यानंतर नीरज आता लॉस एंजिलिस येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतोय. पुढची किमान दोन वर्ष तरी तो अमेरिकेतच राहणार असल्यामुळे मृणालही तिची मालिका संपल्यावर अमेरिकेत जाणार आहे. त्यामुळे पुढची किमान दोन वर्षे तरी मृणालचे दर्शन तिच्या चाहत्यांना घडणार नाहीये.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 303

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds