";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर झाला मृत्यू,

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर झाला मृत्यू,


Add this to your website

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर झाला मृत्यू, जाणून घ्या काय घडले

मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या सेटवर गुरुवारी एक दुःखद घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेसाठी काम करणा-या एका खास व्यक्तीने गुरुवारी जगाचा कायमचा निरोप घेतला. या मालिकेचे हेड प्रॉडक्शन कंट्रोलर अरविंद मर्चंडे यांची 30 जून रोजी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने मालिकेच्या सेटवरच प्राणज्योत मालवली.

सविस्तर वृत्त असे, की ही घटना घडण्यापूर्वी अरविंद यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. मात्र अपचनामुळे छातीत दुखत असावे, असे त्यांना वाटले. त्यांनी त्यावरचे औषध घेऊन पुन्हा कामाला सुरुवात केली. मात्र अचानक दुखणे वाढले आणि सेटवरच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अरविंद यांच्या अकाली निधनाने कलाकारांवर शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर गुरुवारी आणि शुक्रवारी मालिकेचे शूटिंग बंद ठेवण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप द्यायला मालिकेचे सर्व कलाकार रुग्णालयात पोहोचले होते. 39 वर्षीय अरविंद यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु झाली होती. सर्वाधिक काळ चालणारी विनोदी मालिका म्हणून या मालिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
अरविंद मर्चंडे 39 वर्षांचे होते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेसाठी ते हेड प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून काम करत होते.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 346

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds