";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- अक्कासाहेबांचं 'पुढचं पाऊल' थांबणार...

अक्कासाहेबांचं 'पुढचं पाऊल' थांबणार...


Add this to your website

 

Pudhacha Paool serial on Star Pravah to go off air live update

मुंबई : गेली सहा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पुढचं पाऊल’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हर्षदा खानविलकर यांनी साकारलेली ‘अक्कासाहेब सरदेशमुख’ ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा घराघरात पोहचली आहे.

सहा वर्षांहून जास्त काळ चाललेल्या या मालिकेचे दोन हजारपेक्षा जास्त एपिसोड्स झाले आहेत. मात्र शेवटचा एपिसोड कधी टेलिकास्ट होणार, याविषयी अद्याप माहिती नाही. शेवटच्या एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार, याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये कायम आहे.

सासू-सून या टिपीकल विषयावर आधारित असूनही या मालिकेने कायमच वेगळेपण जपलं. पुरोगामी विचारांच्या कणखर अक्कासाहेबांची सून कल्याणीवर असलेली माया कौतुकाचा विषय ठरली होती. अक्कासाहेब यांचा प्रत्येक संवादाच्या अखेरीस ‘कळ्ळं’ हा शब्द प्रचंड गाजला.

हर्षदा खानविलकर यांनी अक्कासाहेब तर जुई गडकरीने कल्याणी ही भूमिका साकारली होती. काहीच महिन्यांपूर्वी कल्याणीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. याशिवाय मृणाल चंद्रकांत, आस्ताद काळे, प्रदीप वेलणकर, शर्मिला शिंदे हे कलाकार मालिकेत झळकले होते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 236

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds