";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- सलमान खानने भरले 'डॉ, हाथी' यांचे हॉस्पिटल बिल

सलमान खानने भरले 'डॉ, हाथी' यांचे हॉस्पिटल बिल


Add this to your website

 

 

 

Image result for कवी कुमार आजाद

सलमान खास आपल्या दानशूरपणामुळे प्रसिद्ध आहे. सलमानने अशीच एक मदत 2010 मध्ये कवी कुमार आझाद म्हणजेच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' टीव्ही शोमधील डॉ हंसराज हाथी यांना केली होती. कवी कुमार आझाद यांची 8 वर्षांपूर्वी बॅरियाट्रिक सर्जरी झाली होती. त्यावेळी डॉ. हाथी यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. ही गोष्ट सलमानला समजल्यानंतर त्याने आझाद यांचे हॉस्पिटल बिल भरले होते. परंतु सलमानने किती बिल भरले होते याची माहिती उपलब्ध नाही. मुंबईच्या सॅफी हॉस्पिटलचे बॅरियाट्रिक सर्जन डॉ. मुफ्फी लकडावाला यांनी डॉ हाथी यांची सर्जरी फ्रीमध्ये केली होती. ऑपरेशननंतर डॉ. हाथी सलमान खानला भेटले होते आणि थॅंक्सही म्हणाले होते. डॉ. हाथी यांचे 9 जुलैला हार्टअटॅकने निधन झाले.

 


कवी कुमार आझाद स्वतःच्या तब्येतीकडे देत नव्हते लक्ष...
- डॉ. लकडावाला यांनी एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. हाथी यांच्या आरोग्याविषयी अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की- डॉ हाथी आपल्या आरोग्याविषयी गंभीर नव्हते. त्यांना अनेकवेळा आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले जात होते परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अभिनयासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत होते.


- डॉ. मुफ्फी यांनी सांगितले की- '8 वर्षांपूर्वी मी त्यांची सर्जरी केली होती. त्यावेळी त्यांचे वजन 265 किलो होते. माझ्याकडे त्यांना आणल्यानंतर ते जवळपास मृत स्थितीमध्ये होते. त्यांना 10 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरशिवाय श्वास घेणे शक्य होत नव्हते.


- बॅरियाट्रिक सर्जरीने त्यांचे वजन 140 किलो कमी करण्यात आले होते. थोड्या दिवसांनी ते ठीक झाले. शूटिंगच्या सेटवर जाऊ लागले आणि एक नॉर्मल आयुष्य जगू लागले होते. त्यानंतर पुन्हा त्यांना बॅरियाट्रिक सर्जरीला सल्ला देण्यात आला, यामुळे तात्यांचे वजन 90 किलो कमी झाले असते परंतु यासाठी ते तयार नव्हते. वजन कमी झाल्यात काम मिळणार नाही असे त्यांना वाटत होते.


- डॉ मुफ्फी यांनी सांगितले की, त्यांनी आझाद यांना पॅडिंगचा वापर करून कॅमेऱ्यासमोर जाण्याचा सल्ला दिला होता परंतु ते तयार झाले नाहीत. सर्जरीच्या काही महिन्यानंतर त्यांचे वजन 20 किलो वाढले होते. ते 160 किलोचे झाले होते. तरीही बॅरियाट्रिक सर्जरी करण्यास तयार नव्हते. जर त्यांनी सर्जरी केली असती तर कदाचित आज जीवनात असले असते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 94

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds