";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- 'शनाया'चा 'माझ्या नव-याची बायको'चा रामराम

'शनाया'चा 'माझ्या नव-याची बायको'चा रामराम


Add this to your website

 

Image result for 'शनाया'चा 'माझ्या नव-याची बायको

 • छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतील शनायाचे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. शनाया या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावतो आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांना शनाया भावते आहे .मात्र आता शनयाच्या फॅन्ससाठी एक निराश करणारी बातमी आहे. रसिकाने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचे शिक्षण घेण्यासाठी रसिका लॉस एंजिलिसला गेली आहे. आता पुढचे फक्त दोनच दिवस शनाया अर्थात रसिका मालिकेत दिसणार आहे. पुढील शिक्षणासाठी सुखरुप लॉस एंजिलिसला पोहचल्याचे रसिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट करुन चाहत्यांना कळवले आहे. सोबतच तिने आपल्या चाहत्यांसाठी एक इमोशनल पोस्ट लिहून शनायाला निरोप द्या पण रसिकावरचे प्रेम असेच कायम राहू द्या, असे लिहिले आहे.

   

  रसिकाने इंस्टाग्रामवर आपल्या फॅन्ससाठी एक पोस्ट लिहिली आहे....

  "गुरुची शनाया, राधिकाची शन्या, अथर्वची ऑफस्क्रिन शनू आणि बकुळाची शेन्या... बाकी भैताड, वेडी, इनोसंट... सगळ्यांची शनाया ही हाक ऐकू आली की वळायची सवय झाली होती, आहे. इतकं की माझी आईपण मला शन्नूच म्हणते. ह्या मुलीने खूप काही दिले मला. ह्या बद्दल मी आधी ही लिहिलंय पण आज तिच्या आठवणी लिहिताना वेगळचं वाटतंय.. एखादं पात्र करताना त्या पात्रासाठी एक जीव होणं काय असतं, हे मला शनायाने शिकवलंय. तिचे सुख, तिचे हसू, तिचे दुःख, तिचा राग, तिचं प्रेम, तिचा स्वार्थ, सगळंच माझं झालं होतं मनातून.. कारण त्यावेळी फक्त शनाया बोलायची... अर्थात तुम्ही तुमच्या प्रेमाने हा दिलासा मिळत गेला आणि तुमच्यासोबत मीही स्वतःच्या नाही पण तिच्या प्रेमात पडत होते, आहे... शनायाच्या बाबतीतलं तुमचं प्रेम कायम असू द्या, रसिकाला मात्र आशीर्वाद द्या! निरोप घेत नाहीये, नवीन काहीतरी घेऊन येईनच!! तुमचं रसिकावरचं प्रेम आणि विश्वास ही माझी ताकद आहे ती तशीच राहू द्या... आणि आता थोडेच दिवस मी तुम्हाला शनाया साकारताना दिसणार आहे. त्यामुळे हे माझे शेवटचे काही भाग आवर्जुन पाहा, जाता जाता थोडं वेगळं करुन पाहिलंय ते ही कस वाटतंय कळवा.."

  पुढे आणखी एक पोस्ट लिहून रसिकाने ती लॉस एंजिलिसला सुखरुप पोहचली असल्याचे तिच्या चाहत्यांना कळवले आहे. शेवटचे दोनच दिवस आता शनाया मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्यामुळे प्लीज नक्की त्याच प्रेमाने बघा, असेही रसिकाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

   
 •  
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 92

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds