";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- सेटवर मिरगी आल्यामुळे मालिकेतून दिला डच्चू

सेटवर मिरगी आल्यामुळे मालिकेतून दिला डच्चू


Add this to your website

 

Image result for केतकी चितळे images

‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेतून अभिनेत्री केतकी चितळे हिला काढून टाकण्यात आले आहे. याबाबतचे कारण अद्याप गुलदस्त्यात होते. केतकीने मात्र सोशल मीडियावर याचा धक्कादायक खुलासा केला आहे. मालिकेच्या सेटवर मिरगी म्हणजे फिट आल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्याचा आरोप तिने शुक्रवारी निर्मात्यांवर केला.

मला एपिलेप्सी म्हणजेच मिरगीचा आजार असल्याचे मी मालिकेच्या क्रिएटीव्ह टीमला कॉण्ट्रक्ट करण्यापूर्वी सांगितले होते. मला एक- दीड तास झोप घ्यावी लागते. हे मालिकेच्या टीमला खटकत होते. झोप न झाल्यामुळे मालिकेच्या सेटवर मला तीन दिवस मिरगीचा ऍटॅक आला. एवढे झाल्यावर तुझ्याविषयी मला आस्था आहे. तू कामच का करतेस, असा सवाल निर्मात्या संगीता सारंग यांनी मला सर्वासमोर केला, असे केतकी म्हणाली. मिरगीच्या आजारामुळे मला शोमधून बाहेर काढले गेले. मी याविरोधात आवाज उठवला. कारण हा माझ्या एकटीवरचा अन्याय नाही तर माझ्यासारख्याच या आजाराने त्रस्त असलेल्या अनेकांवरचा अन्याय आहे, असेही तिने म्हटले आहे.

मालिकेच्या नुकत्याच शूट झालेल्या रंगपंचमीच्या दृश्यांमध्ये आम्हाला परफ्युम सेंटर्ड कलर्स वापरायला दिले. यामुळे माझ्या अंगाला दाह झाला, खाज सुटली. मी याविरोधात बोलल्यामुळे मी उर्मट आहे असे माझ्याबद्दल बोलले गेले. सेटवरचे वातावरण अपमानास्पद होते, अशा सगळय़ा तक्रारींचा पाढा केतकीने व्हिडीओमध्ये वाचला आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 70

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds