";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- महेंद्रसिंग धोनीला ठोठावला दंड

महेंद्रसिंग धोनीला ठोठावला दंड


Add this to your website

स्पोर्ट डेस्क- चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंi धोनीला त्याच्या शांत स्वभवामुळे ''कॅप्टन कूल'' या नावाने ओळखतात. पण काल(ता.11) ला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध झालेल्या सामन्यात 'नो बॉल' देणाऱ्या अम्पायरवर त्याने प्रचंड राग व्यक्त करत थेट मैदानातच चिडचिड केली. या प्रकरणी धोनीला दंड ठोठावण्यात आलाय.


चेन्नई आणि राजस्थानमध्ये झालेल्या सामन्यात अम्पायरच्या चुकीच्या निर्णयामुळे मॅचची चांगलीच चर्चा झाली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अखेरच्या षटकात बेन स्टोक्सचा चौथा चेंडू मुख्य अम्पायर गंधे यांनी 'नो बॉल' दिला होता, पण लेग अम्पायर ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी तो 'नो बॉल' नसल्याचे स्पष्ट केलं.

'नो बॉल' घोषित झालेला चेंडू पुन्हा वैध दिल्याचे कळताच कर्णधार महेंद्रसिंग धोनी अम्पायरला जाब विचारण्यासाठी थेट मैदानत उतरला. मैदानात उतरताच त्याने अम्पायर गंधे यांच्यावर चिडचिड केली, पण दुसरे अम्पायर ऑक्सनफर्ड यांनी त्याची समजूत काढून त्याला माघारी पाठवले. थोड्यावेळाने प्रकरण शांत झाले, पण यावेळ संपूर्ण जगाला महेंद्रसिंग धोनीचे रौर्द रूप पाहायला मिळाले.

आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे धोनीला त्या सामनाच्या मानधनामधील 50 टक्के दंढ ठोठावण्यात आला. धोनीने लेव्हल 2 नियमाचे उल्लंघन केल्याचे आयपीएलकडून कबुली देण्यात आली.


सामन्यात राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे लक्ष दिले होते. पण मिचेल सॅन्टनरने शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार मारून चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून दिला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 76

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds