";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- तब्बल 40 वर्षांनी या अभिनेत्रीने केले अभिनय क्षेत्रात कमबॅक, म्हणून स्विकारली सौमित्रच्या आईची भूमिका

तब्बल 40 वर्षांनी या अभिनेत्रीने केले अभिनय क्षेत्रात कमबॅक, म्हणून स्विकारली सौमित्रच्या आईची भूमिका


Add this to your website

 

 

छोट्या पडद्यावर प्रसारित होणारी 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका यशाच्या शिखरावर आहे. गृहिणी ते उद्योजिका असा राधिकाचा यशस्वी प्रवास या मालिकेत दाखवला आहे. ही मालिका आता अगदी महत्त्वाच्या वळणावर आहे. 'राधिका' आणि 'सौमित्र' यांचे लवकरच लग्न होणार आहे. यात महत्त्वाच्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे सौमित्रची आई. सौमित्रची आई म्हणून प्रसिद्ध अभिनेत्रीने कलाविश्वात तब्बल 40 वर्षांनी कमबॅक केले आहे. सौमित्रची आई म्हणून अभिनेत्री वंदना पंडित-शेठ यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले आहे. वंदना पंडित यांनी 40 वर्षांपूर्वी अभिनेता सचिन पिळगावकर यांच्यासोबत 'अष्टविनायक' या सिनेमात काम केले होते. त्यानंतर 'मुक्ता', 'मणी'सारख्या सिनेमांमध्ये छोटी भूमिका साकारली.

कुठे होत्या एवढी वर्षे? 21 वर्षांच्या असताना वंदना पंडीत-शेठ यांनी 'अष्टविनायक' या सिनेमात सचिन पिळगांवकर यांच्यासोबत काम केले. त्यानंतर 'मुक्ता', 'मणी' सारख्या सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारली. वंदना पंडीत यांचा पुण्यात व्यवसाय असल्यामुळे त्या त्यामध्ये व्यस्त झाल्या. 'लग्नानंतर कौटुंबीक जबाबदाऱ्या आणि व्यवसाय यांमध्ये व्यस्त असल्यामुळे पुन्हा पडद्य़ावर काम करणे झाले नाही,' असे वंदना शेठ यांनी एका मुलाखतीत सांगितले.

असे झाले पुनरागमन... 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत नानींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहिता थत्ते या वंदना शेठ यांच्या मैत्रीण आहेत. एकदा पुण्यात आमची कामानिमित्त भेट झाली तेव्हा तिने मला आता सध्या काय करतेस? असे विचारले. 'चांगली भूमिका असेल तर मला अभिनयात पुन्हा एकदा काम करायला आवडेल असे मी तिला सांगितलं,' असे वंदना यांनी या मुलाखतीत सांगितले.

15 दिवसांतच मिळाली ऑफर...

वंदना थत्तेंसोबतच्या भेटीनंतर अवघ्या पंधरा वीस दिवसांनी झी मराठी वाहिनीकडून मला सौमित्रच्या आईच्या भूमिकेबाबत विचारण्यात आले. भूमिका चांगली असल्यामुळे मी होकार दिला आणि शुटिंगसाठी मुंबईत आले, असे वंदना म्हणाल्या.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 37

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds