";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- कर्मवीर एपिसोडमध्ये पोहोचलेल्या सुनीता कृष्णन यांनी ऐकवली आपबिती

कर्मवीर एपिसोडमध्ये पोहोचलेल्या सुनीता कृष्णन यांनी ऐकवली आपबिती


Add this to your website

 

टीव्ही डेस्क : समाज सेविका सुनीता कृष्णन या आठवड्यात 'केबीसी 11' च्या स्पेशल एपिसोड कर्मवीरच्या पाहुण्या बनणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये सुनीता बिग बींना आपली कथा ऐकवत आहेत. त्यांनी सांगितले की, त्या जेव्हा केवळ 15 वर्षांच्या होत्या तेव्हा 8 लोकांनी त्यांचा रेप केला होता. हे ऐकून अमिताभ हैराण झाले. सुनीता या एनजीओ प्रज्वलाच्या मुख्य अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत. हे एनजीओ लैंगिक तस्करीची शिकार झालेल्या महिला - मुलींचा बचाव आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करते.

17 वेळा झाले जीवघेणे हल्ले... 'केबीसी' च्या प्रोमोमध्ये सुनीताने सांगितले की, त्यांच्या कामामुळे आतापर्यंत त्यांच्यावर 17 वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. मात्र त्या मरणाला घाबरत नाहीत. त्या म्हणतात, "जो पर्यंत माझे श्वास सुरु आहेत, तोपर्यंत इतर मुली, ज्या याप्रकारे पीडित वेश्यालयांमध्ये आहेत. त्यांच्यासाठी मी माझे आयुष्य कमिट करेल."

22 हजारपेक्षा जास्त मुलींना केले आहे मुक्त... प्रोमोमध्ये बिग बींनी सुनीता यांच्याबद्दल सांगितले, "22 हजारपेक्षा जास्त महिला आणि मुलींना लैंगिक तस्करीमधून मुक्त केले आहे. कधीच हार न मानणाऱ्या कर्मवीर सुनीता कृष्णनजी नमन करतो तुम्हाला."

लहानपणापासूनच समाजसेवेची आवड... बंगळुरूमध्ये जन्मलेल्या सुनीता यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड आहे. जेव्हा त्या 8 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी मानसिकपणे दिव्यांग मुलांना डान्स शिकवायला सुरुवात केली होती. 12 वर्षांच्या वयात त्या वंचित मुलांसाठी झोपडपट्ट्यांमध्ये शाळा चालवायच्या.

15 वर्षांच्या वयात जेव्हा त्या दलित कम्युनिटीसाठी नव साक्षरता अभियान चालवत होत्या, तेव्हा 8 लोकांनी त्यांचा बलात्कार केला होता. त्यांना त्यांच्या पुरुष प्रधान समाजात एका महिलेचा हस्तक्षेप आवडत नव्हता.

सुनीता यांना खूप मारलेही गेले. त्यामुळे त्यांचा एक कान डॅमेज झाला आणि त्यांना कमी ऐकू येऊ लागले. मात्र सुनीता यांनी हार मानली नाही आपले समाज सेवेचे काम आजही सुरु ठेवले. 2016 मध्ये त्यांना देशातील चौथा सर्वोच्च सन्मान पद्मश्री देखील मिळाला आहे.

 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 36

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds