";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- टीव्ही अभिनेते आशिष आजारपण आणि आर्थिक परिस्थितीशी देत आहेत लढा, फेसबुकवर लिहिले - 'देवा मला मरण दे'

टीव्ही अभिनेते आशिष आजारपण आणि आर्थिक परिस्थितीशी देत आहेत लढा, फेसबुकवर लिहिले - 'देवा मला मरण दे'


Add this to your website

 

टीव्ही डेस्कः 'ससुराल सिमर का', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकांमध्ये झळकलेले अभिनेते आशिष राय सध्या अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना गोरेगाव येथील एसआरव्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 54 वर्षीय आशिष परिस्थितीला अतिशय कंटाळले असून त्यांनी देवाकडे मृत्यूची याचना केली आहे. आशिष यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले, “सकाळची कॉफी, विना साखरेची, हे हास्य सक्तीचे आहे. देव मला वर उचल.''

आर्थिक संकट आणि आजाराशी झुंज देत आहे आशिष: एका संकेतस्थळाशी बोलताना त्यांनी आपल्या आयुष्यातील वाईट काळाबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले, "मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, माझी प्रकृती ठीक नाही. माझी मूत्रपिंड कार्यरत नाहीत आणि 9 लीटर पाणी माझ्या शरीरात साचले आहे जे शक्य तितक्या लवकर बाहेर काढणे फार महत्वाचे आहे. डॉक्टरांनी औषधे दिली आहेत. तसेच 4 लिटर पाणी काढून टाकले परंतु 5 लिटर पाणी अद्याप शिल्लक आहे. काय होते ते पाहूया.' आशिषला डायलिसीसची गरज आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, डॉक्टर यावर निर्णय घेतील. आशिष पुढे म्हणाले," मी एकटा आहे आणि माझी काळजी घेण्यास कोणीही नाही. मी लग्नही केले नाही. एकटेपणाचा खूप त्रास होतोय. जीवन सोपे नाही.

आशिषकडे काम नाहीः 2019 च्या सुरुवातीच्या महिन्यात आशिष यांना अर्धांगवायू झाला. आशिष म्हणाले, "मी अर्धांगवायूच्या झटक्यानंतर बरा झालो, पण मला काम मिळाले नाही. मी सध्या माझ्या बचतीवर आयुष्य जगतोय पण तेही संपुष्टात येणार आहे. मला कोलकातामध्ये माझ्या बहिणीकडे शिफ्ट केले जाईल, पण इंडस्ट्रीमधील एखाद्याने मला काम द्यावे, अन्यथा काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे.' आशिष एक व्हॉईस-ओवर आर्टिस्ट असून त्यांनी 'जोकर' या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज दिला आहे.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 9

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds