";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- अभिनेत्री स्पृहा जोशी अडकली लग्नबेडीत

अभिनेत्री स्पृहा जोशी अडकली लग्नबेडीत


Add this to your website
Wedding Pics: अभिनेत्री स्पृहा जोशी अडकली लग्नबेडीत, वरद लघाटेसोबत चढली बोहल्यावर
मुंबईः मराठी सिनेसृष्टीत सध्या सनईचौघडे वाजू लागले आहेत. अभिनेता पुष्कर जोग अलीकडेच जस्मिन ब्रम्भारसोबत लग्नगाठीत अडकला. पुष्करनंतर आपल्या लाडिक अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री आणि कवियत्री स्पृहा जोशीसुद्धा शुक्रवारी (28 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकली. प्रियकर वरद लघाटेसोबत स्पृहा बोहल्यावर चढली.
 
दादर येथील शिवाजी पार्क येथील वनिता समाज हॉलमध्ये सकाळी 11.18च्या मुहूर्तावर त्यांचा विवाहसोहळा थाटार पार पडला. सकाळपासून सुरु असलेल्या लग्नसोहळ्याच्या प्रत्येक विधीला स्पृहाने वैविध्यपूर्ण आठ साड्या परिधान केल्या होत्या. 
 
या सोहळ्याला आणि संध्याकाळी झालेल्या स्वागत समारंभाला मराठी सिने आणि नाट्य जगतातील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. उमेश कामत, प्रिया बापट, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, चिन्मय मांडलेकर यांच्यासह 'उंच माझा झोका' आणि 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या स्पृहाच्या गाजलेल्या मालिकांमधील तिच्या सहकलाकारांनी हजेरी लावली होती. 
 
वरद एका नामांकित शेअर ट्रेडिंग कंपनीमध्ये कार्यरत असून त्याने याआधी विविध वृत्तपत्रांतून लिखाण केले आहे. तर कवी मनाच्या स्पृहाचा अलीकडेच लोपामुद्रा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 354

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds