";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- छोट्या पडद्यावर खंडेरायाची छाप

छोट्या पडद्यावर खंडेरायाची छाप


Add this to your website

मुंबई : बघता बघता 2014 सरलं आणि नव्या वर्षाची चाहूल लागली. खरं तर प्रत्येक नवं वर्ष हे जाण्यासाठीच येत असतं जमेची बाजू एवढीच की जाताना ते आपल्याला भरभरुन देऊन जातं. असे काही प्रसंग असतात जे आयुष्यभर सोबत देतात. असे काही क्षण असतात जे नेहमीच आठवत राहतात. कडू-गोड आठवणींचा एक खजिनाच सरत्या वर्षाच्या शेवटी आपल्याकडे उरतो. 2014 हे वर्ष सुद्धा अनेक कारणांनी लक्षात राहिलं.

लक्ष्यवेधी मालिकांच्या यादीत आवर्जून घ्यावं असं नाव म्हणजे 'जय मल्हार' ही मालिका. खंडेराया हे लक्षावधी भक्तजणांचं श्रद्धास्थान. तोच खंडेराया थेट छोट्या पडद्यावरुन त्यांच्या भेटीला आला. साक्षात मल्हारीमार्तंडाचं चरित्र मांडणारी ही मालिका लोकप्रिय झाली नसती तरच नवल.

निर्मात्यांनीही या मालिकेवर भरपूर मेहनत घेतली. कलाकारांच्या निव़डीपासून ते सेटपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यातलं वेगळेपण दिसलं. ग्राफिक्सचा सुंदर वापर ही या मालिकेची जमेची बाजू.

पौराणिक मालिंकाबद्दल बोलायचं झालं तर झी मराठीची ही पहिलीच पौराणिक मालिका. ती एवढी यशस्वी झाली की वर्ष सरता सरता या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत वरचं स्थान पटकावलं.

जय मल्हार नंतर लक्ष्यवेधी मालिकांच्या यादित येणारं आणखी नाव म्हणजे ई टीव्ही मराठीची 'तू माझा सांगाती' ही मालिका. संत तुकारामांची संसारगाथा छोट्या पडद्यावर साकारणं म्हणजे धाडसच. पण निर्माते त्यात 100 टक्के यशस्वी झालेत. आजवर संत तुकारामांच्या संतत्ववार बोललं गेलं लिहिलं गेलं. त्यांचा संतपदापर्यंतचा प्रवास मांडला गेला.  पण या मालिकेने पहिल्यांदाच तुकारामांचा संसार मांडला तोही आवलीच्या नजरेतून.

मालिकेचं लेखन, सादरीकरण, त्यांची भाषा, वेशभूषा या सगळ्यातून तो काळ साकारण्याचा पुरपूर प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून केला गेला आणि म्हणूनच संत तुकाराम आणि आवलीची ही संसारगाथा ठरलीय या वर्षाची लक्षवेधी मालिका.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 307

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds