वडगाव मावळ दि. 28 : येथील आचार्य आयुर्वेद फाउंडेशनच्या प्रांगणात दि. 18, 19 व 20 नोव्हेंबर रोजी कै. राजुजी (अप्पा) आचार्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन दिवसीय प्रवचनमाला आयोजित करण्यात आली. मधुेह विषयाचे प्रख्यात शोधकर्मी डॉ. रवींद्र आचार्य यांच्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ योग-प्राणायाम परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. रवींद्र आचार्य यांच्या मार्गदर्शनानुसार मधुपत्री व प्राणायाम यांच्या सहाय्याने मधुेहमुक्त राजूजी आचार्य स्मृती त्रि-दिवसीय प्रवचनमालेद्वारे ज्ञानधनाचा श्रोत्यांना मनसोक्त लाभ झालेल्या नागरिकांनी डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
दि. 18 नोव्हेंबर रोजी सज्जनगड निवासी मोहनबुवा रामदासी यांचे ‘समर्थांचे विचार’ ह्या विषयावर प्रवचन झाले. दासबोधाच्या आधारे समर्थांची शिकवण समजावून सांगत असताना त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज आणि समर्थांधले गुरु- शिष्य संबंध किती वेगळ्या पातळीवरचे होते हे स्पष्ट केले. कल्याणस्वामींची आपल्या सद्गुरूंवर असलेली प्रगाढ श्रद्धा, समर्थांच्या व कल्याणस्वामींच्या अस्थींचे झालेले विसर्जन, समर्थांच्या स्वयंभू समाधीचा प्रसंग यांसारख्या अपरिचित प्रसंगातून मोहनबुवा यांनी श्रोत्यांसमोर ‘समर्थ विचारांचे’ विवेचन केले. दि. 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावर प्रवचन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजीराजांनी स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी केलेले प्रचंड प्रयत्न, त्यांचा क्लेशदायक मृत्यू आणि त्या मृत्यूुळे पेटून उठलेला महाराष्ट्र, औरंगजेबाला अखेर महाराष्ट्रातच आलेला मृत्यू आदी प्रसंग आपल्या वीरश्रीपूर्ण शैलीत सांगणार्या आफळेबुवांचे प्रवचन ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
दि. 20 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे ‘मातृदेवो भव - पितृदेवो भव’ या विषयावर प्रवचन झाले. आईचे महत्त्व निर्विवादपणे मान्य करताना वडिलांकडे आपले दुर्लक्ष होत असते ह्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुलासाठी भयाण काळरात्री नदी ओलांडणारा वसुदेव, पुत्रशोकाने देह ठेवणारा दशरथ, पंडु राजा यांसारख्या उदाहरणातून त्यांनी वडिलांची माहती समजावून सांगितली. कार्यक्रमाला भास्करराव म्हाळसकर, सुरेशभाई शहा, चंद्रकांत म्हाळसकर, सुनील चव्हाण, प्रवीण चव्हाण, पंढरीनाथ ढोरे, मंगेशकाका ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, डॉ. शाळीग्राम भंडारी, अॅड. निवृत्ती फलके, अॅड. रवींद्र यादव, अॅड. चंद्रकांत रावळ, राजूशेठ बाफना आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी क्षीरसागर, सूत्रसंचालन संजीव सुळे यांनी केले. समारोप डॉ. रवींद्र आचार्य यांनी केला.*