";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- आंदर मावळ एक बहरते केंद्र अपेक्षित

आंदर मावळ एक बहरते केंद्र अपेक्षित

E-mail Print PDF

Add this to your website

 

टाकवे बुद्रुक दि. 23 : आंदर मावळात कृषी पर्यटनवाढीला मोठा वाव आहे. यासाठी येथील विकासाला चालना मिळाली पाहिजे. ठोकळवाडी व शासनाच्या आंद्रा धरणाचे विस्तीर्ण पाणी, सह्याद्रीच्या डोंगरकपार्‍यांतून फेसाळत वाहणारे धबधबे, सभोवतालची हिरवीगार वनराई, अभंगाच्या ओव्या गात माऊली व तुकोबारायांच्या ओढीने निघालेली पवित्र इंद्रायणी नदी हे येथील खरे वैभव आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनाला थोडासा आनंद मिळावा म्हणून हजारो पर्यटकांची पावले या निसर्गाच्या ओढीने आंदर मावळाकडे धावत आहेत. वीकएंडला लोणावळा-खंडाळा यासह सध्या या परिसरात गर्दी वाढू लागली आहे.

निसर्गसमृद्ध परिसर पर्यटकांना खुणावत आहे. आंदर मावळच्या प्रवेशद्वारावरच आळंदी व देहूकडे प्रस्थान करणारी इंद्रायणी नदी सर्वांचे स्वागत करत आहे. वेडीवाकडी वळणे व चढउतारांच्या रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बळीराजाची सध्या भातलावणी सुरू आहे. कोंडिवडे आंद्रा तीरावर वसलेले सुंदर फार्महाऊस सर्वांच्या नजरा वेधून घेते. अशीच वेगवेगळी फार्महाऊस न्याहाळीत पुढे गेल्यावर सावळ्यावरून खांडीमार्गे पुढे जाता येते.

या मार्गावरील निळशी व कांब्रेतील खासगी पिकनिक कँप डोळ्याला भुरळ घालतात. डाहुलीतील सह्याद्रीच्या अवघड कड्यावर जाणारा ट्रेकिंग पॉइंट गिर्यारोहकांना खुणावतो. कळकराई, सावळा, मेटलवाडी येथील डोंगरावरून वाहणारे धबधबे म्हणजे पर्यटकांना वर्षाविहारात चिंब भिजण्याची पर्वणी आहे. बोरवली, डाहुली, लालवाडी, बेंदेवाडी, कुसूर, सावळा आदी गावात घरगुती पद्धतीच्या शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय आहे. चुलीवर केलेल्या रुचकर भोजनाचा स्वाद वेगळाच येतो. राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केल्यास शहरातील पर्यटकांचा कल नक्कीच वाढेल. दोन्ही धरणात बोटिंगची सोय करायला हवी. ओढ्यावर बंधारे तसेच धबधब्याखाली भिजण्यासाठी सिमेंटच्या पायर्‍या, ओढ्यावर बंधारे बांधून पर्यटन विकासासाठी प्रयत्न केल्यास स्थानिकांना रोजगारदेखील उपलब्ध होईल.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 156

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds