ज्येष्ठांचा 3 ऑक्टोबरला मोर्चा

Tuesday, 03 October 2017 10:30 pragati
Print

Add this to your website

वडगाव मावळ, दि. 27 : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार 3 ऑक्टोबर रोजी तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष नामदेवराव डफळ व सचीव प्रदीप साठे यांनी दिली. संयुक्त राष्ट्रसंघाने ज्येष्ठ नागरिकांची वयोर्यादा 60 ठरवली असताना महाराष्ट्र  शासनाने ती 65 केली आहे. ती 60 वर्षेच ठेवावी. श्रावणबाळ वार्धक्य निवृत्तवेतन वाढवावे. ज्येष्ठांसाठी विनामूल्य आरोग्यविमा योजना चालू करावी. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र विभाग व मंत्री नेावा. 60 वर्षांवरील शेतकरी, शेतमजूरांना दरमहा निवृत्तीवेतन द्यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा असून फेस्कॉतर्फे राज्यभर त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Share