";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मावळात चालली आहे धनिकांकडून निसर्गाची हानी

मावळात चालली आहे धनिकांकडून निसर्गाची हानी

E-mail Print PDF

Add this to your website

 

तळेगाव दाभाडे, दि. 3 : धो-धो पडणारा पाऊस, हिरवाईने नटलेले डोंगर, फेसाळत वाहणारे धबधबे असे मावळचे निसर्ग सौंदर्य! पण काही वर्षांपासून विकास व हौस यांच्या नावाखाली त्यात बदल होत गेला. काही धनिकांनी डोंगरच विकत घेऊन मोठमोठे प्रकल्प उभरण्याचा घाट घातला आहे. महसूल व वन खात्याच्या दुर्लक्षामुळे मुरुम-लालमातीचा बेसुार उपसा सुरू असून निसर्गाची लचकेतोड  सुरू आहे. कदाचित भविष्यात डोंगर- टेकड्या नामशेष होण्याचा धोका आहे. मावळात जमिनीला प्रचंड भाव आल्यानेधनिकांची पावले डोंगर-टेकड्यांकडे वळली आहेत. तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. साहजिकच धनिकांचा ओढा मावळाकडे आहे. सरकारने अशा गावांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मावळात दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

तसेच अनेक गावांना दरडीपासून धोका आहे. ग्रामीण भागातील लालमाती बागकामासाठी प्रसिद्ध आहे. त्या मातीचा व्यापारही जोरात चालू आहे. वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदा डोंगर व झाडांची कत्तल करून निसर्गाची हानी होत आहे. राज्यात नावलौकिक असलेल्या लोणावळा-खंडाळा, पवन व आंदरमावळासह अनेक ठिकाणी धनिकांची नजर लागल्याने वृक्षवल्लींनी नटलेल्या या परिसराला सर्वत्र नागरीकरणाचे वेध लागले आहेत. डोंगर टेकडीवर सुरू असलेल्या निवासी विकासाला वेळीचे निर्बंध   घातल्यास माळीण दुर्घटानेच्या पुनरावृत्तीचा धोका होऊ शकतो. तालुक्यातील आठ-दहा गावे धोकादायक असून त्याचा अहवालही सरकारकडे गेला आहे. परंतु अद्याप या गावांचे पुनर्वसन झाले नाही, अशी सर्वत्र चर्चा चालू आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 100

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds