";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- दिव्यांगांच्या सोयीसवलतींबाबत वडगाव मावळमध्ये

दिव्यांगांच्या सोयीसवलतींबाबत वडगाव मावळमध्ये

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

वडगाव मावळ, दि. 13 : पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग व जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 5 डिसेंबर 2018 रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या वेळी पं.स.मा.चे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, सहाय्यक  मार्गदर्शन ग.वि.अ. लक्ष्मण वाजे, गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ, अब्दुल सागे, श्रीनिवास शिंदे, कृष्णा भांगरे, भिमाजी डोंगरे, शोभा गुटले, शंकर सरपाते, अमित बॅनर्जी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या दिनी दिव्यांग तरुण-तरुणी, त्यांचे पालक यांना शासनातर्फे काय योजना पुरवल्या जातात याविषयी आणि ते लाभ पदरात पाडून काय सोप्या योजना आहेत याचे मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन फजलानी इंटरनॅशनल स्कूल, टाकवे बु॥च्या मुख्याध्यापिका श्रीमती पूनम कोटियम, श्रीमती अंकिता कुरणे, फरहम टिमापुरे, नुबेर अहमद, हुसेन मुल्ला यांनी जागतिक दिव्यांग दिनाची माहिती दिली. सुमित्रा कचरे यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले तर शितल शिशुपाल यांनी केले. साधना कचरे, मनीषा कोकाटे, आशा भोसले यांनी आपल्या यशोगाथा सादर केल्या.

कार्यक्रमास एम.आय.एस. को-ऑर्डिनेट शिल्पा लोंढे, सुनीता कुंभारे, श्रीमती रुपाली शेळके, सुचिता भोई, अन्सारी, अर्शद जम्म्पू आदी विशेष साधन व्यक्ती उपस्थित होते. सूत्रसंचालन स्मिता जगताप व शकिला शेख यांनी केले. आभार लता वानवे यांनी मानले. फजलानी इंटरप्रायजेस स्कूल टाकवे बु॥ विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्वांना खाऊ वाटप करून सांगता झाली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 49

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds