";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अठरा वर्षांनंतर मदत केंद्र सुरू, ग्रामस्थांकडून स्वागत

अठरा वर्षांनंतर मदत केंद्र सुरू, ग्रामस्थांकडून स्वागत

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

बेबडओहोळ, दि. 30 : गेल्या 18 वर्षांपासून बंद असलेले परंदवडी गावातील पोलीस मदत केंद्र अखेर 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी उद्घाटन करून सुरू करण्यात आले. यामुळे आता सोळा गावांतील नागरिकांना या ठिकाणी मदत घेता येणार आहे. पोलीस निरीक्षक भानुदास जाधव व नारायण पवार यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. आता येथील नागरिकांच्या तक्रारी व समस्या दूर होतील, येथील गुन्हेगारी रोखण्यास मदत होईल, असे जाधव यांनी सांगितले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक अजित दळवी, वैभव सोनावणे, ज्ञानेेशर बाजीगीरे, संदीप गाडीलकर, अनिकेत हिवरकर, माजी उपसरपंच चंद्रकांत भोते, भरत भोते, गुलाब आंबेकर, विजय भोते, दुर्गा घारे, रोहिणी गराडे, रूपेश गराडे, पांडुरंग गराडे उपस्थित होते. पंचक्रोशीतील गावांची संख्या पाहता येथील गावांच्या मदतीकरिता परंदवडीगावात 2000 साली पोलीस मदत केंद्र सुरू झाले.

मात्र कालांतराने ते बंद पडले. लहान- मोठ्या तक्रारीसाठी रात्री-अपरात्री तळेगाव येथे जावे लागत होते. चोर्‍या-मार्‍या, दरोडे याचे प्रमाण वाढले होते. धामणे येथे दीड वर्षांपूर्वी पडलेल्या दरोड्यात एकाच कुटुंबातील तीन जणांना जीव गमवावा लागला होता. त्या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचे ओशासन दिले होते. केंद्र सुरू करावे, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली होती. त्याची दखल घेत पोलीसनिरीक्षक जाधव यांनी पोलीस मदत केंद्र पुन्हा सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 25

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds