";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मावळ लोकसभा मतदार संघ उमेदवार आयात केलेला की घरचा

मावळ लोकसभा मतदार संघ उमेदवार आयात केलेला की घरचा

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

वडगाव मावळ, दि. 7 : लोकसभा निवडणुकांचे नगारे वाजायला आरंभ झाला असून मावळ मतदार संघाबाबत या वेळी संभ्रावस्थेचे चित्र आहे. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत इथे होत असताना या वेळी ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडली जाणार का याबद्दल चर्चा चालू आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इलेक्टोरल मेरिटच्या नावाखाली बाहेरच्या उमेदवाराला तिकिट दिले जाणार का स्थानिक कार्यकर्त्यांची निवड होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार म्हणून निवडून आलेले असून उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे. साहाजिकच पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळणार का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे. तथापी अशीही चर्चा आहे की पालघर शिवसेनेलाव मावळ भाजपला असा गुप्त समझोत  झालेला असून भाजपतर्फे आ. लक्ष्म  जगताप यांचे नाव समोर आलेले आहे. राष्ट्रवादीतर्फे अजित पवारांचे पुत्र पार्  पवार यांचे नाव सर्वत्र चर्चिले जात होते. ठिकठिकाणी फ्लेक्सही झळकत होते. परंतु शरद पवारांनी आपण स्वत: व सुप्रिया सुळे वगळता कुटुंबीयांपैकी अन्य कोणीही निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केल्यानंतर पार्थ पवार हे नाव मागे पडले. परंतु काहींच्या मते कार्यकर्त्यांच्या आग्रहाला बळी पडून पवारसाहेब पार्थच्या नावाला संती देऊ शकतात. याच संदर्भात दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांचेही नाव आता मावळसाठी चर्चेत आलेले आहे. पार्थ पवार अथवा स्मिता पाटील यांची मावळातून व अमोल कोल्हे यांची शिरूरमधून उमेदवारी निश्चित झाली तर वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षकार्य करणार्‍यांचे काय असाही सवाल पुढे येऊ शकतो.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 49

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds