";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- वाहक, चालक कमी असूनही तळेगाव परिवहन आगार अग्रेसर

वाहक, चालक कमी असूनही तळेगाव परिवहन आगार अग्रेसर

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

इंदोरी, दि. 22 : वाहक व चालकांची कमतरता असूनही केवळ अधिकारी व कर्मचारी यांच्यातील एकजूट, समन्वय, सहकार्य व आगाराच्या प्रगतीचा ध्यास यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे. तुटीचे प्रमाण घटत असल्याने तळेगाव एस.टी. आगार विभागात अग्रेसर झाले आहे, अशी माहिती आगार प्रमुख तुषार माने यांनी साप्ताहिक अंबरशी बोलताना दिली. अलीकडे मावळातील रस्ते सुस्थितीत असल्याने एस.टी. बसगाड्यांच्या नादुरुस्तीचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. चाकण, तळेगाव, टाकवे, उर्से या ठिकाणच्या एमआयडीसीमुळे मावळात विशेषत: तळेगाव, वडगाव भागात झपाट्याने कामगार वस्ती वाढत आहे.

विविध जिल्ह्यातील कामगार असल्याने तसेच तीर्थक्षेत्रांना जाणारे प्रवासीही वाढले असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या वाढवल्या आहेत. एकूण 42 गाड्यांपैकी 12 लांब पल्ल्यांसाठी (तुळजापूर 3, पंढरपूर 2, बीड 2, कोल्हापूर 2 औरंगाबाद 1, बार्शी 1) दररोज धावतात. 10 मध्यम लांब पल्ल्यासाठी (नाशिक 7, शिर्डी 1, फौजी आंबवडे 1, भगवान गड 1) धावतात. उर्वरित स्थानिक प्रवासी वाहतूक, विद्यार्थी सहली व अन्य प्रासंगिक करारासाठी धावतात. परिवहन मंडळाने कमी असलेले 10 चालक व 22 वाहक दिले व आणखी 7 नवीन बसगाड्या दिल्यास आगाराची स्थिती मजबूत होईल

अशी अपेक्षा सहाय्यक वाहतूक अधीक्षक वसंत अरगडे व सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मल्हार शिंदे यांनी व्यक्त केली. ओवळे, निगडे, निळशी, गोंटेवाडी, शिवणे, पवना व पनवेलसाठी शटलसेवा आहे. तर 10 गाड्या स्थानिक विविध गावांध्ये मुक्कामी असतात. 42 गाड्यांपैकी 34 साध्या व 8 सेी आहेत. या आगाराच्या दररोज एकूण 200 फेर्‍या होत असून 16630 कि.मी. प्रवास होतो. खाजगी अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस.टी. महामंडळाचे प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तरीही विविध अडचणींवर मात करत प्रवाशांना अधिकाधिक सेवा देण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असतो, अशी माने यांनी खात्री दिली.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 36

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds