";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- 'बाय वन अँड गेट वन फ्री' लवकरच हद्दपार होणार!

'बाय वन अँड गेट वन फ्री' लवकरच हद्दपार होणार!

E-mail Print PDF

Add this to your website

पुणे : ‘बाय वन अँड गेट वन फ्री’ किंवा ‘बाय थ्री अँड गेट टू फ्री’ अशा प्रलोभनांना बळी पडून आपल्यातले अनेकजण शॉपिंग करत असतील. पण महिन्याभरापूर्वी लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात GST चा परिणाम म्हणून आता या फ्री पॉलिसी बंद होणार आहे.

बाजारात ‘बाय वन अँड गेट वन फ्री’ म्हणजेच एक खरेदी करा, आणि दुसरी फूकट न्या, अशा  अनेक ऑफर्सचे फलक सर्रासपणे दिसतात. अनेकदा फ्री वस्तूंच्या प्रलोभनापायी आपण आवश्यक नसलेली वस्तूही खरेदी करतो.  मात्र आता ही मोफत असणारी स्कीमच बंद होणार आहे.

कारण जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवाकराच्या नव्या कायद्यामुळे मोफत स्कीमचं अर्थकारणच बिघडलं आहे.  त्यामागचं गणित म्हणजे याआधी एखाद्या वस्तूवर मॅक्सिमम रिटेल प्राईस म्हणजे MRP किती छापावी? याचा कायदाच नव्हता. त्यामुळे त्यावरची किंमत वाढवून कंपन्या फ्री दिलेल्या वस्तूंचेही पैसे वसूल करत होते.

पण आता फ्री दिल्या जाणाऱ्या वस्तूंवरही जीएसटी हा कर लागणार आहे. त्यामुळेच फ्रीची पॉलिसीच बंद करण्याचं अनेक कंपन्यांनी ठरवलं आहे.

वास्तविक, मोफतची स्कीम ही ग्राहकाला अडकवण्याचं जाळचं असतं. कारण कोणतीही कंपनी स्वतःचं दिवाळं काढून, मोफत वस्तू वाटणार नाही. जीएसटीमुळे त्यामागचं अर्थकारण उलगडलं असून, सध्या याचं अर्थकारण कोलमडल्यामुळे कंपन्या या ऑफर बंद करणार आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 46

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds