";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- 'कल्याणी टेक्नो फोर्ज'च्या अकाऊंटंटची आत्महत्या

'कल्याणी टेक्नो फोर्ज'च्या अकाऊंटंटची आत्महत्या

E-mail Print PDF

Add this to your website

Pimpari : Accountant in Forge Company commits suicide latest update

 

 

पिंपरी चिंचवड : कल्याणी टेक्नो फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश गायकवाडने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चाकणमधील एका हॉटेलमध्ये विष प्राशन करुन त्याने आयुष्य संपवलं. निलेशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘कल्याणी टेक्नो फोर्ज’ कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचं नाव आहे.

चाकण येथील गंधर्व हॉटेल मध्ये निलेश तीन दिवसापासून रहायला आला होता. मात्र दोन दिवसांपासून त्याने दरवाजा न उघडल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाला संशय आला. त्यानंतर निलेशने रुममध्येच आत्महत्या केल्याचं समोर आलं.

आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘कल्याणी टेक्नो फोर्ज’ कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचं नाव आहे. अमित कल्याणी यांना एका व्यवहारासाठी निलेशने 15 कोटी रुपये घेऊन दिले होते. त्यापैकी साडे अकरा कोटी रुपये अमित यांनी परत केले. मात्र उर्वरित रक्कम आणि निलेशचे 60 लाखाचे कमिशन देण्यास अमित टाळाटाळ करत होते.

तर दुसरीकडे 15 कोटी रुपये देणारी संबंधित व्यक्ती निलेशच्या मागे पैशासाठी तगादा लावून बसली होती. यातच त्याने टोकाचं पाऊल उचललं. चाकण पोलिस अधिक तपास करत आहेत.

सुसाईड नोटमधील अखेरचा भाग

सर्वांना सांभाळ, मी तुझ्याबरोबर सदैव असेन आणि मला माफ कर, तुझ्यासोबत जास्त काळ थांबू शकलो नाही.
कृपा करुन या सर्व घटनेला आणि कृत्याला माझ्या बायकोला, आईला, पप्पाना आणि घरच्यांना जबाबदार धरु नये. आणि कल्याणी साहेबानी जर रुपये दिले तर त्यांना सोडून द्या.

तुमचा, निलेश

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 155

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds