";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- 70 वर्षीय आजीचे तरुणांनी वाचवले प्राण

70 वर्षीय आजीचे तरुणांनी वाचवले प्राण

E-mail Print PDF

Add this to your website

पुणे- कपडे धुण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या 70 वर्षीय आजीचे एका तरुराचे प्राण वाचवले. अचानक पावसाचे जोर वाढल्याने नदीच्या मध्यभागी आजी अडकल्या होत्या. मात्र, नागरिक आणि रेस्क्यू विभागाच्या वतीने आणि 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आजीला नदीच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. शशिकला डोके असे या आजीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे येथील घोड नदीत अडकलेल्या आजीला साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. शशिकला डोके या काल (शुक्रवारी) दुपारी घोड नदी पात्रात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र सकाळपासून डिंभे धरण क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने धरणातून 12,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली आणि आजी नदीतील मध्यभागी असलेल्या खडकावर अडकल्या. मदतीची याचना केल्यानंतर गावकऱ्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु केले. मात्र पाण्यात हळूहळू लक्षणीय वाढ झाली.

मंचर पोलिसही घटनास्थळी दाखल झाली. एनडीआरएफ पथकाला याबाबत कळविण्यात आले. तसेच डिंभे धरणातील पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्या सूचना दिल्या. अखेर स्थानिकांनी एकमेकांचे हात धरून साखळी केली आणि ट्रकच्या टायरची ट्यूबसह दोरीच्या मदतीने नदीत प्रवेश केला. साधारण पन्नास ते साठ फूट आत अडकलेल्या या आजीला तीन तासानंतर बाहेर काढण्यात यश आले. या आजीवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 114

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds