";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपाशी

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपाशी

E-mail Print PDF

Add this to your website
 
 
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपाशी; जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे- शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. शासकीय मेसमधील जेवणाचा दर्जा खालावत चालल्याने विद्यार्थ्यानी जेवण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासनाकडे वारंवार तक्रार करून देखील अद्याप या विद्यार्थांच्या मेसच्या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
 
तक्रार करुनही स्थिती जैसे थे
मोशी येथे 750 विद्यार्थांसाठीचे हे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी राहत आहेत. मात्र त्यांच्या मेसमधील जेवणाचा दर्जा उत्तम नसल्याने 70 विद्यार्थांनी समाजकल्याण आयुक्त यांना 13 तारखेला तक्रार दिली. अद्यापही त्यांच्या तक्रारींची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यानी वसतिगृहामधील ही मेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण
विद्यार्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 दिवसापासून मेसमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. याबाबत मागील महिनाभरापासून आम्ही शासकीय पातळीवर 3 वेळा लेखी तक्रारी देऊनही समाधान झालेले नाही. वसतिगृहाचे रेक्टर वाघमारे सरांनी सलग तीन वेळा समाजकल्याण आयुक्त पुणे, प्रादेशिक आयुक्त पुणे, समाजकल्याण अधिकारी डोंगरे यांना कळवले असतानाही त्यावर महिन्यापासून कसल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. त्यामुळे 70 मुलांनी 13 तारखेला समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे निवेदन 
दिले होते, त्यांनी आश्वासन देऊनही मेस आणखी चालू झाली नाही, गेल्या दोन दिवसापासून मेस बंद असल्यामुळे मुले उपाशी आहेत. लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती विद्यार्थ्यानी केली आहे.
 
प्रश्न मार्गी कधी लागणार
जेवणाचा दर्जा निकृष्ट, वसतीगृहात अस्वच्छता अशीच काहीशी परिस्थिती शासकीय वसतीगृहांची झालेली दिसून येत असल्याने प्रशासन यावर काय कारवाई करणार आणि विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी कधी लागेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 43

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds